पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक बंद

पुणे–मागील आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. विसर्ग करण्यात आलेले पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रवाहात वाहत आहे त्यामुळे डेक्कन नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. […]

Read More

खडकवासला धरणात बुडून दोघांचा मृत्यू

पुणे–खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला खडकामध्ये असलेल्या डोहात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. . विजय नागनाथ रोकडे (वय 24, रा. बराटे चाळ, वारजे) आणि रॉबीन (अंदाजे वय […]

Read More

मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे- नाना पाटेकर

पुणे-‘ मुसलमानांना देखील इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे, ते पण इथलेच आहेत की. त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे’, मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. नाम फाउंडेशनच्या वतीने आज खडकवासल्या जवळच्या बहुली येथे आगीत जळालेली 16 घरे बांधून देण्यात आली आहेत. ही घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते […]

Read More

पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली : खडकवासला धरणातून विसर्ग

पुणे–पुणे जिल्ह्यातील टेमघर, पानशेत, वरसगाव तसेच खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे.  त्यामुळे धरण पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तर पावसाने पवना नदीला पूर आल्याने चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर परिसर पाण्याखाली गेले आहे. दुसरीकडे भीमशंकर पट्ट्यातही पावसाचे […]

Read More