पुणे: जागतिक शांततेसाठी जीवन समर्पित करणारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ १८ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत यूके, यूएसए आणि फ्रान्स येथे रवाना होणार आहे. तसेच अमेरिका येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करणार आहे. शिक्षण आणि मानवतेसाठी दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी त्यांना ही पदवी २५ एप्रिल २०२४ रोजी बहाल करण्यात येणार आहे.
२१ एप्रील रोजी अमेरिकेतील ऑर्ट इन्स्टीट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी विश्वधर्मी प्रा.डॉ. कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्याचे मिशन हाती घेतले आहे.
प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात जाणार्या शिष्टमंडळात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, संचालक डॉ. महेश थोरवे, विश्वशांती विभागाचे अधिष्ठाता प्रा. मिलिंद पात्रे व व्यवस्थापनाशास्त्र विभागाचे प्रा. गौतम बापट यांचा समावेश आहे.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे १९ एप्रिल रोजी लंडन येथील ऑक्सफोर्डमध्ये ‘मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती’ या विषयावरील गोलमेज परिषदेत विचार मांडतील. या परिषदेमध्ये वॉर्विक येथील लॉर्ड टेलर, थोर शिक्षणतज्ञ डॉ. नील हॉक्स, लंडन येथील तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे विचारवंत डॉ. गौतम चक्रवर्ती, लंडन स्थित इंडियन हाय कमिशनच्या डॉ. निधी चौधरी, केंब्रिज विद्यापीठाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. ब्रायन फोर्ड, स्वित्झरलँड येथील डॉ. जेफ्री क्लेमेंटस हे सहभागी होणार आहेत. या परिषदेमध्ये मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पध्दतीच्या तत्वावर आधारित इंडो ब्रिटिश ग्लोबल एज्युकेशन मॅनेजिंग कौन्सिल चा विशेष प्रस्ताव सर्वानुमते मांडला जाणार आहे.
२० एप्रिल रोजी हाऊस ऑफ लार्डस ब्रिटिश पार्लमेंटमधील अँटली अँड रीड हॉल येथे होणार्या सभेमध्ये ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य, लॉर्डस, आंतरराष्ट्रीय पत्रकार, लंडन प्रेस आणि मिडियाचे प्रतिनिधी व ब्रिटनमधील नामांकित तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, विचारवंत, समाजसेवक व गणमान्य यांच्याबरोबर मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा तत्वावर आधारित इंडो ब्रिटिश ग्लोबल एज्युकेशन मॅनेजिंग कौन्सिल या संकल्पनेवर डॉ. कराड विचार मांडतील.
२१ एप्रील रोजी अमेरिकेतील ऑर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यानात विज्ञान, धर्म आणि अध्यात्म या भूमिकेचे सार आणि तत्वज्ञान सांगितले त्या ठिकाणी युगप्रवर्तकाचे स्मरण करण्यासाठी डॉ. कराड हे अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ शास्त्रज्ञ आणि एमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील.
तसेच अमेरिका येथील उटाह राज्यातील ब्रिघॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे प्रा.डॉ. कराड यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच २८ एप्रिल रोजी जवळपास २० हजार लोकांसमोर डॉ. कराड यांचे संत ज्ञानेश्वर ते डॉ. अल्बर्ट आईन्स्टाइन या विषयावर व्याख्यान देणार आहे.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे असे मत आहे की, शरीर आणि बुद्धीचा विकास करणे हे शिक्षणाचे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे. परंतू मन आणि आत्म्याच्या विकासावरही शिक्षण पद्धती लक्ष केंद्रित करू शकली तर व्यक्तीचा सर्वांगीण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विकास होईल.
आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा.मिलिंद पात्रे, संचालक डॉ. महेश थोरवे आणि डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये हे उपस्थित होते.