Private information should not be given to anyone in the digital age

डिजिटल युगात खाजगी माहिती कोणालाही देऊ नये -रितेश भाटीया

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे :”तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल व्यवहार ज्या ज्या वेबसाईडवर होतात तेव्हा संबंधीत व्यक्तीचा संपूर्ण डेटा जमा होत असतो. अशा वेळेस आपली खाजगी माहिती कोणालाही देऊ नका. यातून ५० टक्के आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या घटना कमी होतील. जर  आर्थिक  फसवणुक झालीच तर १९३० वर संपर्क साधावा.”असा सल्ला व्ही ४ वेब सायबर सिक्यूरिटीचे संस्थापक आणि संचालक रितेश भाटीया यांनी दिला.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या रिसर्च, इनोव्हेशन, डिझाइन अ‍ॅण्ड एंटरप्रेन्यूअरशिप म्हणजेच (राइड-२३) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे.

यावेळी रूबी स्कॅब लॅब्सचे संस्थापक आणि सीईओ डॉ. प्रशांत पानसरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात व कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, डॉ. संजय कामतेकर, प्रा.डॉ. दिनेश सेठी व प्रा. डॉ. नीरज महेन्द्रू  उपस्थित होते. या वेळी ६ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

रितेश भाटीया म्हणाले,” सोशल मिडिया खूप धोकादायक असून युवकांनी याचा वापर अत्यंत सांभाळून करावा. यामध्ये बर्‍याच क्राइम घटना रोज घडत असतात. अशावेळेस विद्यार्थ्यांनी रिसर्च व इनोव्हेशन करतांना त्यात एथिकल्सचा वापर करावा. ओला व उबेर सारख्या तंत्रज्ञानाने काली पिली टॅक्सी ड्रायव्हरचे मोठे नुकसान केले आहे. सोशल मीडिया हे धोकादायक आहेच परंतू ज्या मध्ये भविष्य आहे असे  एआय मध्ये सुध्दा धोका उद्भवत आहे. ”

डॉ. प्रशांत पानसरे म्हणाले,” भारतीय अर्थव्यवस्थेत वृद्धी होत असतांना डिजिटल आणि एआय मध्ये भविष्य आहे. भारत सरकारने डिजिलॉक, यूआयडी, आधार, यूपीआय सारख्या अनेक गोष्टी सुरू करून डिजिटलला प्राधान्य देत आहेत. यामुळे देशात परिवर्तनाची लाट आली आहे. क्यूआर कोड मुळे आर्थिक व्यवहारात ही बदल घडत आहेत. यामुळे डिजिटल शक्ती वाढत आहे. अशा वेळेस नव आंत्र्यप्रेन्यूअरने ई हेल्थ, कृषी क्षेत्र, बॅकिंग क्षेत्रात संधी आहे. शाश्वत विकासासाठी विद्यार्थ्यांनी नवकल्पनांवर व संशोधनावर अधिक भर दयावा.”

डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” देशाची आर्थिक  व्यवस्था जलद गतीने वाढत आहे. येथील युवा उद्योजकांकडून नव नवीन कल्पना व उद्योग सुरू असतांना पुढील काही दिवसात रूपयांचे मूल्य वाढून डॉलरच्या ही पुढे जाईल. यूएसए मधील जनसंख्या कमी असून सुद्धा त्या देशातील आर्थिक  व्यवस्था सुदृढ आहे. अशावेळेस विद्यार्थ्यांनी स्टार्टअपवर अधिक भर द्यावा.” 

प्रा. निरज महेन्द्रू यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा.डॉ गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *