पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची विक्रमी ३० तासानंतर सांगता


पुणे–पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीने आत्तापर्यंतचा विक्रम मोडीत काढला आहे. सुमारे ३० तासांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. २०१४ मध्ये २९ तास १२ मिनिट मिरवणूक चालली होती. त्यानंतर यावर्षी विक्रमी वेळ नोंदवत पुण्यात ३० तास मिरवणूक चालली.

राज्यात नव्याने आलेल्या सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे आणि गेली दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सवातील उत्साहावर विरजण पडल्याने यंदाची मिरवणूक जोमात आणि जोशात होणार, असा सर्वांचाच अंदाज होता. उत्सवाच्या काळातही कार्यकर्ते आणि भाविक यांचा उत्साह ओसंडून वाहाताना दिसून आला. दरम्यान, या सर्व परिस्थितीत गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचे दिसले.

विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून लवकरता लवकर संपवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गणेश मंडळांना केले होते. मात्र त्याचा कोणत्हा परिणाम झालेला दिसून आला नाही. एकेक मंडळ दीर्घ काळ मार्गावर थांबून राहात असतानाही, पोलिसांनी कोणत्याही स्वरूपाची जबरदस्ती केली नाही आणि कारवाईचा बडगाही उचलला नाही. त्यामुळे मानाचे गणपती विसर्जित होण्यासच सुमारे अकरा तास लागले. त्यानंतरही विशेष आकर्षण असलेल्या दगडूशेठ आणि मंडई मंडळाच्यागणपतींना मिरवणुकीत सहभागी होण्यास दरवर्षीपेक्षा विलंब झाला. प्रचंड गर्दीतही टिळक चौकातून किमान सात रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत वेळेत पोचविण्यात आल्या.

अधिक वाचा  पुण्यात पुन्हा एकदा गव्याच्या दर्शनाने पुणेकरांची तारांबळ

ध्वनिने धोकादायक पातळी गाठली

दरम्यान, यंदा कुठलेही निर्बंध नसल्याने पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत यंदा ढणढणाटाने अतिधोकादायक पातळी गाठली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तंत्रशास्त्र विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शनिवारा, सकाळी ८ वाजल्यानंतर शरातील काठी भागातील ध्वनिपातळी १२८.५ डेसिबलवर पोहोचली. ही पातळी अतिधोकादायक समजली जाते. राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षीच्या मिरवणुकीत सर्वच शासकीय यंत्रणांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. त्याचा परिणाम आवाजाचा अतिरेक होऊन कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनीने सारा परिसर दुमदुमून गेला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love