पुणे-“कै. दौलतराव मराठे म्हणजे स्वेच्छा रक्तदान चळवळीतील भीष्माचार्य होते त्यांनी केलेले रक्तदान क्षेत्रातील कार्य आपण अधिक जोमाने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल”.असे उदगार जनकल्याण रक्तकेंद्रचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.आशुतोष काळे यांनी काढले.
कै. दौलतराव मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कर्वेनगर मधील गिरीजा शंकर सभागृहात मातृभूमी प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते. शिबिराच्या उदघाटनप्रसंगी मातृभूमी प्रतिष्ठानचे सायंदेव देहाडराय,प्रथमेश जाखलेकर,गिरीजा शंकर सोसाटीचे अध्यक्ष संजय कबाडे,सचिव कैलास धंड, सुधीर जवळेकर,उल्हास जोशी,उदयन पाठक,संतोष अनगोळकर,वेदांत मराठे,संजीव मराठे,अनिल वाघ यांची मुख्य उपस्थिती होती. एकूण १२६ रक्त दात्यांनी रक्तदान केले.कर्वेनगर,वारजे परिसरातील नागरिक व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ. काळे पुढे म्हणाले, दौलतराव मराठे हे रक्तदान कार्यांत झोकून देणारे कार्यकर्ते होते.त्यांनी अनेकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटच्या क्षणापर्यंत जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले.आत्तापर्यंत हजारो गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले.जनकल्याण रक्तपेढी च्या कार्यात ते कार्यमग्न असत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गणेश तांबे यांनी केले.कल्याणी कोंडे यांनी रक्तदान गीत सादर केले.