स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस एक मार्गदर्शक विचारप्रणाली म्हणून अखंड कार्यरत – रामदास काकडे

Congress functioned continuously as a guiding ideology during the pre-independence period
Congress functioned continuously as a guiding ideology during the pre-independence period

पुणे–भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोणावळा शहर काँग्रेस कमिटी, तसेच सेवादल कमिटीच्या वतीने जे.आर.डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार (J.R.D. Tata Udyog Ratna Award) प्राप्त झाल्याबद्दल उद्योजक रामदास काकडे यांचा सत्कार करण्यात आला. (Congress functioned continuously as a guiding ideology during the pre-independence period)

लोणावळा येथील श्रीराम मंदिर गवळीवाडा या ठिकाणी ध्वजावंदन झाल्यानंतर रामदास काकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, मावळ तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष यशवंत मोहोळ, शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, प्रांतिक सदस्य नासिरभाई शेख, बाबुभाई शेख, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, महिलाध्यक्षा पुष्पाताई भोकसे, नगरसेवक सुधीर शिर्के, पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, जयश्री सुराणा, राजाभाऊ गवळी, दिलीप लोंढे, रवी सलोजा, अब्बास खान, सेवादलचे शहराध्यक्ष सुनील मोगरे, शुभम जोशी, जाकीर शेख, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधीकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  ३५व्या पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप स्पर्धा उत्साहात संपन्न

रामदास काकडे म्हणाले, की काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीयांना स्वराज्य व सुराज्य प्राप्त करण्याबाबत एक अखंड जीवनप्रणाली म्हणून कार्यरत होता. देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाचा मोठा त्याग व बलिदान असून, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे व भरीव योगदान दिलेले आहे.

काँग्रेस पक्ष एक वैचारिक प्रणाली असून, भविष्यामध्ये स्थिर देशांतर्गत परिस्थिती काँग्रेस पक्षाशिवाय निर्माण होणार नाही, असे मत प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केले.

रामदास काकडे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, काँग्रेस पक्ष आगामी काळात यशाची शिखरे गाठल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास चंद्रकांत सातकर यांनी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love