अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपाची विश्वासार्हता संपली : जयंत पाटलांचा दावा, तात्पुरते फारकत घेतली जाण्याची शंका

अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपाची विश्वासार्हता संपली
अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपाची विश्वासार्हता संपली

पुणे(प्रतिनिधी)–अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही थोडसे दूर उभे रहा, असे भाजपवाले त्यांना म्हणू शकतील. तुम्ही वेगळी निवडणूक लढवा. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. अशा प्रकारचा सल्ला दादांना दिला जाऊ शकतो, अशी शंका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमानंतर ते बोलत होते. पाटील म्हणाले, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळे व्हावे, वेगळे लढावे, असे कदाचित त्यांना सांगितले जाऊ शकते. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपाची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही, तर सबंध देशात कमी झाली आहे.

राज्याची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्राचे नेतृत्व दूरदृष्टी असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते. त्यांनी अनेक निर्णय घेतले व त्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा जलद विकास झाला. भौगोलिकदृष्टय़ा राज्याला असलेले महत्त्व व सामाजिक सौहार्द यामुळेही ते शक्मय झाले. आता देशातील अनेक राज्यांमध्ये विमानतळ झाले, बंदरे झाली, रस्ते तयार झाले. त्यामुळे आता स्पर्धा आहे. म्हणूनच राज्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच स्तरांवर गंभीरपणे वाटचाल करायला हवी. तसे होताना दिसत नाही. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे, सामाजिक सौहार्द खराब करणारी वक्तव्ये सातत्याने होणे, निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे, अशा गोष्टी होत आहेत. राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे. तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य आहे. येत्या काळात सरकारी कर्मचाऱयांचा पगारही करता आला नाही, तर आश्चर्य वाटायला नको, अशी भीतीही पाटील यांनी व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  प्रभाग रचनेत दुरुस्ती करून प्रभाग 5 आणि 44 हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत -नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी