पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज – रामदास आठवले

पुणे– “पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांशी चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री […]

Read More

निवडणुकीपूर्वी मी येणारच असे म्हणणारे परत आले नाही म्हणून राज्य अस्थिर करण्यासाठी सत्तेचा गैरवापर -शरद पवार

पुणे – आम्ही अनेक सरकारं पाहिलं, राज्यविषयी केंद्र सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असायचा. पण आता भाजप सरकारकडून तसं होताना दिसत नाही. अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही […]

Read More

सीमावर्ती भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढत चाललेले असंतुलन देशाच्या ऐक्यास, अखंडतेस आणि सांस्कृतिक ओळखीचा विचार करता गंभीर संकटाचे निमित्त होऊ शकते- सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत

हे वर्ष आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ७५ वे वर्ष आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आम्ही स्वतंत्र झालो. आम्ही आमच्या देशाला पुढे नेण्यासाठी आमच्या देशाची सूत्रे आमच्या हाती घेतली. ‘स्वाधीनता’ ते ‘स्व-तंत्रता’  या आमच्या प्रवासाचा तो प्रारंभ बिंदू होता. आम्हाला एका रात्रीत  स्वातंत्र्य मिळाले नाही हे आम्ही सर्व चांगल्या प्रकारे जाणतो. स्वतंत्र भारताचे चित्र कसे असेल, […]

Read More

बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची करोडोची लूट : विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा

पुणे -मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपाने पुनवर्सन संपादित जमीनीवरील इतर अधिकारात असलेले पुनवर्सनाचे शेरे कमी करण्याकरिता राज्यातील पुनवर्सन अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर आदेशाने पुनवर्सन शेरे कमी करत शेतकरी बाधंवाकडून करोडोची लूट करताना दिसत आहेत. असा आरोप करत 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये पुनवर्सनाचे शेरे घोटाळा प्रकरणाचे मुख्य सूत्रधार […]

Read More

14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा गळा चिरून खून

पुणे- पुण्यातील बिबवेवाडी भागातील यश लॉन्स येथे १४ वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय १४ रा. व्ही आय टी कॉलेज अप्पर बिबवेवाडी, पुणे)असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा खून झाला असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केला आहे. क्षितिजा ही कब्बडी […]

Read More

रावण टोळीच्या कराड येथून मुसक्या आवळल्या : गुंडा विरोधी पथकाची कारवाई

पुणे–पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील कुविख्यात रावण टोळीच्या सदस्यांना कराड येथून अटक केली आहे. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरज चंद्रदत्त खपाले (22, रा. रोकडेवस्ती, चिखली), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (21, रा. रोकडेवस्ती, चिखली), सचिन नितीन गायकवाड (21, रा. […]

Read More