सातव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग चे 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान पुण्यात आयोजन

एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2026 पुणे
एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2026 पुणे

पुणे: भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक डायलॉग (एईडी) चे 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. जिओ इकोनॉमिक्स बियाँड ग्लोबलायझेशन – टेरिफ, टेक्नोलॉजीज ॲन्ड स्ट्रॅटेजिक अलाइनमेंट या संकल्पनेवर आधारित ही आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच पाषाण येथे नव्याने उभारलेल्या पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कन्व्हेंशन हॉल येथे होणार आहे.

या तीन दिवसीय परिषदेत 12 आंतरराष्ट्रीय सत्रे होणार असून भारत,भूतान,श्रीलंका,तैवान,सिंगापूर,केनिया,ऑस्ट्रेलिया आणि नॉर्वे सह 9 देशांतील 45 हून अधिक वक्ते सहभागी होतील. यामध्ये धोरणकर्ते,अभ्यासक आणि उद्योगतज्ञ यांचा सहभाग असेल. ही माहिती एशिया इकोनॉमिक डायलॉग 2026 चे संयोजक ॲम्बेसिडर गौतम बंबावाले (निवृत्त), पुणे इंटरनॅशनलचे विश्वस्त डॉ.अजित रानडे व पीआयसीचे संचालक दिनानाथ खोलकर यांनी दिली.

अधिक वाचा  Bharat Asmita National Award : भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर: प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, ज्योथिमणी सेन्नीमलाई, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान होणार सन्मान

पहिल्या दिवशी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर हे उपस्थितांचे स्वागत करतील. त्यानंतर उद्घाटन संपन्न होईल.उद्घाटनानंतर ॲम्बेसिडर गौतम बंबावाले यांच्या अध्यक्षतेखाली जिओ इकोनॉमिक्स बियाँड ग्लोबलायझेशन हे चर्चासत्र आयोजित केले जाईल.त्याचबरोबर फायरसाईड चॅट या विशेष कार्यक्रमात डॉ.विद्या येरवडेकर या भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांची मुलाखत घेतील.दुसऱ्या दिवशी ड्युएल इंटेलिजन्स,सार्वजनिक आरोग्य व आर्थिक विकास तसेच धोरणात्मक संरक्षणामधील उच्च तंत्रज्ञान,भारतामधील संरक्षण उत्पादनासाठी तंत्रज्ञान व एशिया चीप कॉरिडॉर अशा विविध विषयांवर चर्चासत्रे पार पडतील.त्याचबरोबर फायर साईड चॅट या विशेष कार्यक्रमात भारत फोर्ज चे व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांची मुलाखत घेतली जाईल.

तिसऱ्या दिवशी जागतिक व्यापार व इंडियन ओशन क्षेत्रात भू-अर्थशास्त्र या विषयावर चर्चासत्रे होतील. समारोपाच्या कार्यक्रमाला भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माजी परराष्ट्र सचिव ॲम्बेसिडर निरूपमा राव (निवृत्त) उपस्थित असतील.पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ.विजय केळकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

अधिक वाचा  फर्टाडोस स्कुल ऑफ म्युझिक तर्फे संगीत शिक्षणासाठी नवा उपक्रम

एशिया इकॉनॉमिक डायलॉग दरम्यान पीआयसीच्या कॅम्पस मध्ये २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान क्राफ्ट एक्स्पो आणि पलाश या कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पलाश या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक टी.एम.कृष्णा सहभागी होणार असून हा कार्यक्रम म्हणजे संगीत आणि संवादाचा उत्तम मिलाफ आहे. वुई, द पीपल ऑफ इंडिया या त्यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love