अजित पवारांनी नावांच्या पाट्यांची अदलाबदल करत शरद पवारांच्या शेजारी बसण्याचे टाळले ..

Ajit Pawar swapped name plates and avoided sitting next to Sharad Pawar
Ajit Pawar swapped name plates and avoided sitting next to Sharad Pawar

पुणे(प्रतिनिधी) — राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) दोन्ही गटांमध्ये एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, सोमवारी (Monday) पुण्यातील (Pune) मांजरी (Manjari) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील (Vasantdada Sugar Institute – VSI) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Deputy Chief Minister Ajit Pawar) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शेजारी बसणे पुन्हा एकदा टाळले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar and Ajit Pawar) यांची विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढलेल्या जवळीकीच्या आणि दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या (Both NCP factions) एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांची ही कृती पुन्हा राजकीय वर्तुळात (political circles) चर्चेचा विषय ठरली. या घटनेने पवार काका-पुतण्याच्या (Pawar uncle-nephew) राजकारणातील सस्पेन्स (suspense) कायम राहिला आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (Both NCP factions) पुण्यात (Pune) उद्या  (मंगळवार) (Tuesday) स्वतंत्र वर्धापनदिन कार्यक्रम (separate foundation day programs) असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कोणताही ‘संभ्रम नको’ (no confusion) यासाठीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात (political circles) रंगली आहे.(Ajit Pawar swapped name plates and avoided sitting next to Sharad Pawar)

कार्यकर्त्यांमध्ये कोणताही ‘संभ्रम नको’ (no confusion) म्हणून?
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील (Vasantdada Sugar Institute) कार्यक्रमात आयोजकांनी प्रोटोकॉलनुसार (protocol) केलेली बैठक व्यवस्था स्वतः बदलत, अजित पवारांनी (Ajit Pawar) ही ‘सावध भूमिका’ (cautious stance) घेतली असून, उद्या (मंगळवार दि. १० जून) (Tuesday, June 10) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (Both NCP factions) पुण्यात (Pune) स्वतंत्र वर्धापनदिन कार्यक्रम (separate foundation day programs) असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कोणताही ‘संभ्रम नको’ (no confusion) यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात (political circles) रंगली आहे.

अधिक वाचा  बोपदेव घाट रेप केस : आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस : आरोपींच्या शोधासाठी "सिंबा" या एआय तंत्रज्ञानाची पोलिस मदत घेणार

राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडल्यानंतर सुरुवातीचे एक वर्ष अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांसोबत (Sharad Pawar) कोणत्याही कार्यक्रमासाठी एकत्र येणे टाळले होते. मात्र, राज्य सरकारमध्ये (state government) त्यांच्या पक्षाची कोंडी होत असल्याचे चित्र निर्माण झाल्यावर, ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) पुन्हा जवळ येत असल्याचे दिसू लागले. व्हीएसआयने (VSI) एआय तंत्रज्ञानासंबंधी (AI technology) आयोजित केलेल्या तब्बल पाच बैठकांसाठी अजित पवार आणि शरद पवार (Ajit Pawar and Sharad Pawar) एकत्र आले होते. त्यातूनच दोन्ही राष्ट्रवादी (Both NCP factions) एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती.

सोमवारी (दि. ९ जून) (Monday, June 9) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (Vasantdada Sugar Institute) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (sugarcane farmers) एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाची (AI – Artificial Intelligence technology) माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सगळ्यांच्या नजरा शरद पवार आणि अजित पवारांवर (Sharad Pawar and Ajit Pawar) खिळल्या होत्या. कारण मंगळवारी (Tuesday) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Both NCP factions) पुण्यात (Pune) स्वतंत्र वर्धापन दिनाचे कार्यक्रम (separate foundation day programs) आयोजित केलेले असल्याने, व्हीएसआयच्या (VSI) या कार्यक्रमाची चर्चा होणे स्वाभाविकच होते.
या कार्यक्रमात अजित पवारांनी (Ajit Pawar) नावांच्या पाट्यांची अदलाबदल करत शरद पवारांच्या (Sharad Pawar) शेजारी बसण्याचे टाळले. व्हीएसआयच्या (VSI) व्यवस्थापनाने स्टेजवर शरद पवारांच्या (Sharad Pawar) शेजारी अजित पवारांच्या (Ajit Pawar) बसण्याची व्यवस्था केली होती, जे प्रोटोकॉलनुसार (protocol) योग्य होते. कारण शरद पवार (Sharad Pawar) व्हीएसआयचे (VSI) अध्यक्ष आहेत तर अजित पवार (Ajit Pawar) हे विश्वस्त (trustee) आणि राज्य मंत्रिमंडळातील (state cabinet) सर्वात वरिष्ठ मंत्री (senior most minister) आहेत. मात्र, अजित पवारांनी (Ajit Pawar) स्वतःच्या हाताने आपली नावाची नेम प्लेट उचलून त्याजागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Cooperation Minister Babasaheb Patil) यांच्या नावाची नेम प्लेट सरकवली. त्यामुळे बाबासाहेब पाटलांना (Babasaheb Patil) काका-पुतण्यामध्ये (uncle-nephew) बसण्याची वेळ आली.

अधिक वाचा  दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाहीये : जयंत पाटील

अजित पवारांच्या (Ajit Pawar) या कृतीमुळे राजकीय वर्तुळात (political circles) अनेक चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी (Tuesday) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (Both NCP factions) स्वतंत्र मेळावे (separate rallies) होणार असताना, अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांमध्ये उगीच संभ्रम नको (no confusion) म्हणून ‘सावध भूमिका’ (cautious stance) घेतली का? अशीही चर्चा आता रंगली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचे (Both NCP factions) उद्या वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन (Foundation Day)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) (NCP Sharad Pawar Faction) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) (NCP Ajit Pawar Faction) या दोन्ही गटांकडून उद्या  (१० जून) (June 10) पक्षाचा वर्धापन दिन (Foundation Day) स्वतंत्ररीत्या वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरात (Pune city) या दोन्ही गटांच्या कार्यक्रमांकडे (programs) संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागले आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (NCP) वर्धापन दिन सोहळा उद्या  (१० जून) (June 10) सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे (Balgandharva Rangmandir, Pune) येथे पार पडणार आहे. या मेळाव्यात शरद पवार (Sharad Pawar) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (local body elections) पार्श्वभुमीवर काही महत्त्वाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) गटाचा वर्धापन दिन मेळावा उद्या  (१० जून) (June 10) दुपारी १ वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे (Shri Shivchhatrapati Sports Complex, Balewadi, Pune) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation elections) पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांकडून (both leaders) कोणती राजकीय रणनीती (political strategy) जाहीर होते, कोणती नवी दिशा (new direction) दिली जाते आणि पक्षकार्यकर्त्यांना (party workers) काय संदेश (message) दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love