एव्हीएन (अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस) या आजारावर डीजीसीआय मान्यताप्राप्त ऑसग्रो पद्धत वापरून जहांगीर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार


पुणे : भारताच्या पहिल्या नैसर्गिक अस्थि पेशी (बोन सेल) थेरपीसह पुण्यातील निवासी रुग्णांवर रिग्रो बायोसायन्सेस या भारतीय जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केलेल्या डीजीसीआय मान्यताप्राप्त ऑसग्रोचा वापर करून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे एव्हीएन (अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ) या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचारपद्धती करण्यात आली  आहे . एव्हीएन ( अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस)  या आजारवर करण्यात येणारी ऑसग्रो ही पेशीवर आधारीत उपचार पद्धती आहे. हि उपचार पद्धत सर्वात प्रथम पुण्यातील ५७ वर्षीय पुरुष व ३६ वर्षीय महिलेवर करण्यात आली आहे.

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ची मुख्य कारणे  प्रामुख्याने  व्यसन , चुकीची औषध पद्धती , तसेच हाडांची झीज झाल्यामुळे होते. ऑसग्रोसाठीची शस्त्रक्रिया हि अस्थिप्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या तुलनेने स्वस्त आणि वेदनारहित आहे. या अस्थि पेशी उपचारपद्धती तंत्राचा वापर करून एव्हीएनच्या रुग्णांवर उपचार केलेल्या रिग्रो बायोसायन्सेसच्या नेटवर्कमधील अस्थिविकारतज्ज्ञांनी हे तंत्र सुरक्षित व परिणामकारक असल्याचा निर्वाळा दिला आहे. शस्त्रक्रियेनंतरची वैद्यकीय काळची सोपी आणि दोन आठवड्यांसाठी अंशतः वजन-धारणा (वेट-बेअरिंग) कृती यात समाविष्ट आहे. सहा आठवड्यांसाठी क्ष-किरण चाचणी करण्यात येते, वार्षिक एमआरआय आणि पुढील वर्षी दर सहा महिन्यांनी डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी करणे अपेक्षित असते.

अधिक वाचा  नितीश कुमारांचे भाजपशी काडीमोड घेण्यामागे खरे कारण काय? सुलतान गंजचा कोसळलेला पूल की बिहार जमुई मध्ये सापडलेली सोन्याची खान?

 नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वात प्रथम कोपरगाव येथील ५० वर्षीय हेमंत बदादे हे नितंबांच्या सांध्याची स्थिती बिकट झाल्यामुळे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलध्ये आले होते. ही परिस्थिती उत्तरोत्तर गंभीर होत गेल्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणेही अशक्य झाले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार घेण्याची आवश्यकता होती. त्यांच्या दोन्ही नितंबांना एव्हीएन (अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस) हा आजार झाल्याचे निदान झाले.त्यांच्या नितंबाच्या सांध्याला गंभीर इजा झाली आहे. पण त्यांच्या डाव्या बाजूच्या नितंबाचा आजार तिसऱ्या टप्प्यावर होता आणि त्याला पूर्ववत करणे अशक्य होते. डिसेंबर २०२१ मध्ये रुग्णाच्या डाव्या बाजूकडील नितंबावर ड्युअल मोबिलिटी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच वेळी त्यांच्या उजव्या नितंबावर बोन सेल थेरपी ऑसग्रो पद्धतीने पहिल्या टप्प्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली.  

अधिक वाचा  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी किंवा निवडणुका हा चांगला पर्याय - सुप्रिया सुळे

  मे २०२१मध्ये अशाच प्रकारचा आजार झालेल्या अजून एक रुग्ण आढळल्या. नितंबाच्या सांध्याच्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पुण्यातील संपदा या ३६ वर्षीय विवाहित महिला जहांगीर हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्यांच्यावर  डॉ. अरबाट यांनी उपचार केले .

 संपदा यांच्या नोंदी आणि रिपोर्ट्स पाहिल्यानंतर डॉ. अरबाट म्हणाले, “या प्रकरणात संपदा या तरुण महिला होत्या आणि त्या बाळाचे नियोजन करत होत्या. पण गुंतागुंत, वेदना आणि अस्वस्थपणामुळे त्या हे पाऊल उचलू शकत नव्हत्या. कालांतराने त्यांचा आजार बळावला आणि त्यांना चालणे, बसणे किंवा दैनंदिन कामे करणेही अशक्य होऊ लागले. त्यांच्या क्ष-किरण रिपोर्टमध्ये त्यांच्यात एव्हीएनची सुरुवातीची लक्षणे दिसून आली आणि ऑसग्रो तंत्राने उपचार करण्याच्या एका सत्राने त्यांच्या आजारावर उपचार करणे शक्य होते.”डॉ. अरबाट यांनी शिफारस केल्यानुसार संपदा ८ जुलै २०२१ रोजी हॉस्पिटलमध्ये आल्या. या वेळी डॉ. अरबाट यांनी ऑसग्रो तंत्राच्या पहिल्या टप्प्याची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर याच तंत्रासाठी त्यांनी तिसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले गेले.

अधिक वाचा  अनिश्चिततेच्या रोलर कोस्टर राईडमधून अम्युझमेंट पार्क इंडस्ट्रीला वाचवा :द इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅण्ड इंडस्ट्रीजची पंतप्रधानांकडे मागणी

 जहांगीर हॉस्पिटलमधील युनिट प्रमुख आणि वरिष्ठ सांधे प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. आशीष अरबाट म्हणाले की  बहुतेकांना एव्हीएन या हाडांच्या आजाराविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी काहीही माहिती नसते  पण एव्हीएन म्हणजे बोन डेथ सन्ड्रोम या आजाराची संवेदनशीलता, त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आम्ही  नेहमीच तत्पर असतो. आमच्याकडे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आजारावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे आज रुग्ण पूर्वपदावर आले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love