जामिनावर सुटका झालेल्या आरोपींचे फटाके वाजवून स्वागत करणे पडले महागात

Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up
Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up

पुणे–खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांचे फटाके वाजवून स्वागत करून नागरिकांना दमदाटी केल्याची घटना शिवणे येथे  घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिस नाईक संतोष नांगरे यांनी फिर्याद दिली आहे. सागर भागवत वारकरी (वय २१, रा. राहुलनगर, शिवणे), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. वेदगौरव सोसायटी, शिवणे), आकाश सिब्बन गौंड (वय १९), सागर राजेंद्र गौड (वय १९, रा. कदमवस्ती, शिवणे) आणि त्यांचे समर्थक सूरज राजेंद्र गौड (वय २४, रा. एनडीए रोड, शिवणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तसेच, इतर पसार झालेल्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

ही घटना शिवणेमधील राहुलनगर येथील बसस्टॉपसमोर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. गतवर्षी एकाचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड आणि सागर गौड या संशयितांना अटक झाली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केल्यानंतर ते कारागृहातून बाहेर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी साथीदार दुपारी राहुलनगर येथील बसस्टॉपवर जमले होते. त्यांनी हे चौघे आल्यावर जोरजोराने घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यावेळी नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी करून दहशत निर्माण केली. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पाच जणांना ताब्यात घेतले. तर, अन्य पाच ते सहाजण पसार झाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love