
विमान व रस्ते अपघातामुळे देशातील व राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आत्तापर्यंत अकाली एक्झिट घ्यावी लागली आहे. त्यामुळे काळानुसार कितीही तांत्रिक प्रगती झाली असली, तरी राजकारण्यांच्याच सुरक्षिततेचा मुद्दा आजही कळीचाच असल्याचे अजित पवार यांच्या निधनामुळे अधोरेखित झाले आहे. मागच्या काही दशकांमध्ये अपघातात अनेक नेत्यांच बळी गेला असून, त्यामुळे देशाचे व राज्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. यापैकी काही घटनांचा घेतलेला हा आढावा.
गोपीनाथ मुंडे
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, केंद्रात प्रथमच मंत्रिपद भूषविल्यानंतर दिल्ली येथे 3 जून 2014 रोजी कार अपघातात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. 64 वर्षीय मुंडे यांची ओबीसींचे नेते अशीही ओळख होती. त्यानंतर बीडमध्ये परळीत झालेल्या अंत्यसंस्कारामध्ये शेकडो संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
वाय एस राजशेखर रेड्डी
आंध्र प्रदेशचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेस नेते वाय एस राजशेखर रेड्डी यांचा 2009 साली रुद्रकोंडा डोंगरकडावर हेलीकॉप्टरच्या झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांचे चॉपर बेपत्ता झाल्यानंतर साधारण 24 तासांनंतर त्यांच्या अपघाताची बातमी समजली. काँग्रेसला आंध्र मध्ये मुळे घट्ट करण्यात रेड्डी यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी देखील आंध्रचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
राजेश पायलट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे जून 2000 मध्ये राजस्थानमध्ये रस्ते अपघातात निधन झाले. पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात ते क्रेंद्रीय राज्यमंत्री होते. भारतीय वायू सेनेत सेवा केलेल्या पायलट यांनी यानंतर राजकारणात प्रवेश केला होता.
माधवराव शिंदे
सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या विमान अपघातात काँग्रेसचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन झाले. ग्वलियरच्या घराण्याचे वंशज असलेल्या आाणि मध्य प्रदेशच्या गुना मतदारासंघाचे प्रतीनिधीत्त्व करणारे शिंदे हे नऊ टर्म या भागातून निवडून आले. सध्या त्यांचे पुत्र ज्योतीरादित्य शिंदे हे राजकारणाचा वारसा चालवित आहेत.
संजय गांधी
1980 साली विमान अपघातात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचे निधन झाले. क्रांतीकारी विचारसरणी असलेल्या संजय गांधी यांना विमान उडविण्याची आवड होती. याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. या हवाईप्रवासादरम्यानच त्यांचा अंत झाला.
जीएमसी बालयोगी
3 मार्च 2002 साली तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी हे आंध्र प्रदेशात हेलीकॉप्टरच्या अपघातात मरण पावले.
साहिब सिंग वर्मा
माजी केंद्र्रीय मंत्री व दिल्लीचे मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा राजस्थानमध्ये रस्ते अपघातात जून 2007 साली निधन झाले. भाजप नेते असलेल्या वर्मा हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते.
ग्यानी झेलसिंग
वयाच्या 78 व्या वर्षी नोव्हेंबर 1994 मध्ये माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे पंजाबात रस्ते अपघातात निधन झाले.
ओ. पी. जिंदाल
जिंदाल ग्रुपचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते ओ. पी. जिंदाल यांचे मार्च 2005 मध्ये उत्तर प्रदेश मधील सहारनपूर जवळ हेलीकॉप्टर अपघातात निधन झाले.
विजय रुपानी
भाजप नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे जून 2025 मध्ये एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडनच्या विमानाच्या अपघातात निधन झाले. रुपानी यांच्यासह अनेकांना यात आपले प्राण गमवावे लागले. 2016 ते 2021 या काळात रुपानी यांची गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.
डोरजी खांडू
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे 2011 साली चीनच्या सीमारेषेजवळ हेलीकॉप्टर बेपत्ता झाले होते. त्यानंतर या चॉपरचा अपघात होऊन, त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले.
सीडीएस बिपीन रावत
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस बिपीन रावत यांचे 8 डिसेंबर 2021 रोजी हेलीकॉप्टर अपघातात निधन झाले.
अजित पवार
28 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी केंग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबई ते बारामतीदरम्यान हेलीकॉप्टरच्या अपघातात निधन झाले. पायलटसह सहा जणांचा यात मृत्यू झाला.













