लग्नात चारचाकी व १५ तोळे सोने देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ : राज्य महिला आयोग व पोलीस आयुक्तांनीही घेतली नाही दखल

लग्नात चारचाकी व १५ तोळे सोने देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ
लग्नात चारचाकी व १५ तोळे सोने देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ

पिंपरी (Pimpri) (प्रतिनिधी) : राज्यात पुण्यातील (Pune) प्रतिष्ठित व उच्चभ्रू परिवारातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हुंडा (Dowry) व त्यातून हत्या की आत्महत्या प्रकरण गाजत असताना पुण्यातील आयटी हब (IT Hub) असणाऱ्या हिंजवडी (Hinjawadi) येथील लग्नात चारचाकी गाडी, १५ तोळे सोने (Gold), तसेच इतर महागड्या वस्तू देऊनही सासरच्या लोकांकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेने याबाबत राज्य महिला आयोगाकडे (State Women’s Commission) व पुणे पोलीस आयुक्तांकडे (Pune Police Commissioner) लेखी तक्रार करूनही अद्याप दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आपला छळ सुरूच असल्याची माहिती ऐश्वर्या आदित्य हुलावळे (Aishwarya Aditya Hulawale) यांनी पत्रकार परिषद (Press Conference) दिली. यावेळी ऐश्वर्या (Aishwarya) यांचे आईवडील उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना ऐश्वर्या हुलावळे (Aishwarya Hulawale) (माहेरचे नाव ऐश्वर्या बबन गव्हाणे (Aishwarya Baban Gavhane)) यांनी सांगितले, की पती आदित्य अरुण हुलावळे (Aditya Arun Hulawale) यांच्याशी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी मयुरी पॅलेस (Mayuri Palace), आळंदी रोड (Alandi Road), भोसरी (Bhosari) येथे हिंदू विवाह पद्धतीने (Hindu Marriage) मोठ्या थाटामाटात पार पडला होता. यावेळी माझ्या वडिलांनी सासरकडच्यांनी लग्नात मागणी केल्याप्रमाणे एक चारचाकी वाहन (Four-wheeler) (सासूच्या नावावर रजिस्टर), १५ तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व अन्य सुख सुविधेच्या सर्व वस्तू लग्नात दिल्या गेल्या. वडील ८१ टक्के दिव्यांग (Disabled) असूनही केवळ मुलीच्या सुखासाठी त्यांनी लग्न चांगल्या प्रकारे लावून दिले होते.

अधिक वाचा  डेटिंग साठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७९ वर्षीय जेष्ठ व्यक्तीची १७ लाखांची फसवणूक

लग्नानंतर पती (Husband), सासू (Mother-in-law), दीर (Brother-in-law), आजोबा (Grandfather), मावस सासू (Maternal Aunt-in-law), मावस सासरे (Maternal Uncle-in-law) यांनी काही दिवसांतच छळ करण्यास सुरवात केली. लग्नानंतर तीन महिन्यानंतर पतीचे बाहेरील अनैतिक संबंध (Extramarital Affairs) कळल्यावर सासरच्यांनी पतीला समज देण्याऐवजी मला मारहाण (Assault), शिवीगाळ (Abuse) करीत माझा छळ सुरू केला. तसेच ‘माहेरून पाच लाख रुपये घेऊन आल्यास नांदवू, अन्यथा घरातून निघून जा’ अशी वारंवार धमकी (Threat) देत रात्री साडेबाराच्या सुमारास मारहाण केली व घराबाहेर काढण्याची धमकी दिली जात होती.

वारंवार होत असलेले अत्याचार (Atrocities), शिवीगाळ (Abuse), धमक्या (Threats) देत असल्याने अखेर या संदर्भात डिसेंबर २०१७ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) तक्रार (Complaint) दाखल केली होती. यावेळी पोलीस ठाण्यातही सासरच्याकडून ‘तू जर तक्रार दाखल केली, तर आम्ही तुला नांदवणार नाही’, अशी धमकी दिली गेली. ५ जानेवारी आणि १५ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात (Pune Police Commissioner’s Office) जाऊन तक्रार अर्ज दिला. यावेळी दोन्ही कुटुंबाला एकत्रित बोलावून एकमेकांची समजूत काढून मिटवून घेण्यास सांगितले गेले. मात्र, यावेळी देखील प्रकरण मिटले नाही. त्यानंतर पुन्हा ३ मार्च २०१८ ला हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये (Hinjawadi Police Station) तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही. २४ डिसेंबर २०१८ रोजी मात्र मी खूप प्रयत्न केल्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला.

अधिक वाचा  हुंड्याच्या बळी, छळाच्या कहाण्या : एका सुनेची साक्ष आणि दुसऱ्याचा जीव घेणारा अन्याय

हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये (Hinjawadi Police Station) गुन्हा (Crime) नोंद करताच ३ जानेवारी २०१९ रोजी मी माहेरी (Parent’s Home) गेले. ५ जानेवारी रोजी वकिलाकडून (Lawyer) नोटीस (Notice) देण्यात आली. या नोटीसला मी दोघांकडून तसे हमीपत्र (Undertaking) लिहून घेणार असाल, तर हमीपत्र देण्यास तयार आहे, असे उत्तर दिले होते. त्यानंतर सप्टेंबर २०१८ रोजी पतीकडून घटस्फोट (Divorce) बाबत पत्र देण्यात आले.

कोरोना लॉक डाऊन (Corona Lockdown) काळ व परिस्थिती काही शांत होती. मात्र, पुन्हा २०२२ च्या सुरवातीपासून पुन्हा हुलावळे (Hulawale) कुटुंबाकडून धमक्या देत तक्रार मागे घेण्यासाठी तगादा लावला जात होता. यावेळी मी याबाबत पुन्हा तक्रार दाखल केली.

तसेच राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपालीताई चाकणकर (Rupalitai Chakankar) यांच्याकडे मार्च २०२५ मध्ये तक्रार अर्ज केला. मात्र, त्यांच्याकडून देखील माझी दखल घेण्यात आली नाही. तसेच पोलीस प्रशासनही (Police Administration) मदत करीत नसल्याचा आरोप ऐश्वर्या हुलावळे (Aishwarya Hulawale) यांनी केला असून, महिलांवरील अत्याचारा (Atrocities against Women) संदर्भात व त्यांच्या सुरक्षेबाबत (Women’s Safety) प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा महिलांवरील होत असणाऱ्या हुंडा (Dowry) व त्यातून आर्थिक व शारीरिक छळ (Financial and Physical Harassment) होत आहेत. दोषींवर कारवाई करून आपल्याला न्याय (Justice) मिळवून द्यावा, अशी मागणी ऐश्वर्या हुलावळे (Aishwarya Hulawale) यांनी यावेळी केली.

अधिक वाचा  सीमा वादाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी भारत-चीनची कोअर कमांडर स्तरावर चर्चा
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love