मुंबई – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविषयीच्या वक्तव्यांवरून त्यांना फटकारले आहे. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेसविषयी (Congress) केलेले वक्तव्य हे बालिशपणाचे आहे, त्यांना आणखी काही गोष्टी शिकण्याची गरज आहे, अशा शब्दांत थोरात (Thorat) यांनी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना सुनावले आहे.
सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस (Congress) नेत्यांनी एका तासात राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेऊन दाखवावी असे विधान आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केले होते. यावर बोलताना थोरात (Thorat) यांनी म्हटले की, सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) बोलले ते खरे आहे. मात्र, त्यांनी स्वतःचे आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे. जीवनात कदाचित काही बदल होतात, तरीही ज्यांनी जीवनात योगदान दिले त्याचे ऋण लक्षात ठेवले पाहिजे.
थोरात (Thorat) यांनी सांगितले की, खरं आहे की सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आता, आमदार आहेत. ते आता स्वतंत्र आहेत. मांडणी करायला हरकत नाही, परंतु कोणती गोष्ट मांडावी आणि कोणती नाही, हे शिकावे लागेल. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेसचे (Congress) ऋण विसरू नये. त्यांच्या जीवनात काँग्रेसचे (Congress) योगदान महत्त्वाचे आहे. काँग्रेसचे (Congress) योगदान सत्यजित (Satyajeet) यांच्यासाठी खूप चांगले राहिले आहे.
आपल्या जीवनात ज्यांनी काही आपल्यासाठी केले आहे, त्यांचे ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजे. बाहेर बोलले नाही तरी अंत:करणात खोलवर ते ठेवले पाहिजे. माणसाने त्याचे ऋण मानले पाहिजे. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी युवक काँग्रेसमध्ये (Youth Congress) काम केले आहे आणि त्यांना काँग्रेसनेच (Congress) वेगवेगळ्या संधी दिलेल्या आहेत. यासारख्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.