वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण : शवविच्छेदन अहवालातील माहिती, पती, नणंद, सासूच्या पोलीस कोठडीत वाढ

Vaishnavi Hagavane has 29 wounds from beatings on her body.
Vaishnavi Hagavane has 29 wounds from beatings on her body.

पुणे (Pune)(प्रतिनिधी)– वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात (Vaishnavi Hagawane Dowry Death Case) एक नवीन माहिती सोमवारी समोर आली असून, आत्महत्या करण्याच्या दिवसापर्यंत वैष्णवीला सासरच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचे (Brutal Beating by In-laws) स्पष्ट झाले आहे. वैष्णवी हिच्या शवविच्छेदन अहवालात (Post-mortem Report) तिच्या अंगावर एकूण २९ मारहाणीचे व्रण (29 Injury Marks) मिळाले असून त्यातील पाच ते सहा व्रण ताजे असल्याचेदेखील नमूद करण्यात आले आहे. तसेच आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणेचा कुटुंबियांकडून छळ होत असल्याची माहितीदेखील बावधन पोलिसांनी (Bavdhan Police) सोमवारी न्यायालयात दिली. दरम्यान, वैष्णवी हिचा पती शशांक हगवणे (Shashank Hagawane – Husband), नणंद करिष्मा हगवणे (Karishma Hagawane – Sister-in-law), सासू लता हगवणे (Lata Hagawane – Mother-in-law) यांच्या पोलीस कोठडीत (Police Custody) २८ मेपर्यंत वाढ (Extension till May 28) करण्यात आली आहे. (Vaishnavi Hagavane has 29 wounds from beatings on her body)

अधिक वाचा  पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी: हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुष छळ: पित्याचा आक्रोश

शशांक हगवणे व त्याची आई आणि बहीण यांची कोठडीची मुदत संपुष्टात आल्याने सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे (First Class Judicial Magistrate V.P. Khandare) यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. या वेळी सरकारी वकील नितीन आडगळे (Public Prosecutor Nitin Adgale) यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने या आरोपींच्या पोलीस कोठडीत २८ मेपर्यंत वाढ केली आहे. वैष्णवी हिचा सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane – Father-in-law) आणि दीर सुशील हगवणे (Sushil Hagawane – Brother-in-law) यांनादेखील २८ मेपर्यंत पोलीस कोठडी आहे. त्यामुळे वैष्णवी हिच्या आत्महत्यास कारणीभूत ठरलेल्या संपूर्ण हगवणे कुटुंबास (Hagawane Family) २८ मे रोजी एकत्रितच न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अधिक वाचा  सत्तापक्षाच्या मनात पाप नसेल तर ‘आरक्षण ठरावावर’ विरोधकांना बोलावयास देऊन चर्चा का घडवली नाही? - गोपळदादा तिवारी

न्यायालयात युक्तिवादा दरम्यान पोलिसांनी सांगितले, की वैष्णवी हिच्या शरीरावर मृत्यूपूर्वी जखमा आढळून आल्या. तिला मारहाण करण्यासाठी आरोपींनी कोणते साधन वापरले (Tool Used for Beating), ते जप्त करणे बाकी आहे तसेच मारहाणीच्या कारणाबाबत सखोल चौकशी (In-depth Inquiry into Cause of Beating) करणे आहे. घटनेनंतर फरार झालेल्या राजेंद्र व सुशील हगवणे यांनी वापरलेले मोबाईल (Mobile Phones), कार (Car) जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच वैष्णवी हिच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नात दिलेली महागडी भांडीदेखील (Expensive Utensils from Wedding) जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी नीलेश चव्हाण (Nilesh Chavan – Accused) हा याप्रकरणात अद्याप फरार असून पोलीस पथके त्याचा शोध (Search for Absconding Accused) घेत आहेत. त्याबाबत अटक आरोपी यांच्याकडून त्यांच्या सोबतच्या संबंधाची अधिक माहिती घेणे आहे. हगवणे कुटुंबाची सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत (Bank Accounts Frozen). वैष्णवीचे लग्नात मिळालेले सोने हगवणे कुटुंबाने तारण का ठेवले (Why was Wedding Gold Hypothecated)? त्यातून येणाऱया रकमेचे हगवणे कुटुंबाने पुढे काय केले, याबाबत तपास करणे बाकी आहे. हगवणे कुटुंबाची एकत्रित चौकशी करावयाची असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करून मिळावी. अशी मागणी करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love