पुणे(प्रतिनिधि)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.13 मे) जाहीर करण्यात आला. राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेलल्या मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. नऊ विभागीय मंडळात यंदाही कोकण विभाग अव्वल असून नागपूर विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येईल.
निकाल कुठे पाहाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.targetpublications.org
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 99.82 टक्के
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 28,512 खाजगी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यर्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9,448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिस एकूण 16,10,108 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्याधी परीक्षेश प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतची टक्केवारी 92.27 आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (98.82 %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (90.78%) आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 असून मुलांच्या उत्तीर्णतची टक्केवारी 12.31 आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 ने जास्त आहे.
माध्यमिक शालान्त (इ. 10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 करता एकूण 62 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण 24 विषयांचा निकाल 100 % टक्के लागला आहे.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4,88,745 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 4,97,277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3,60,630 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 1,08,781 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.