पुणे-भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर विकासाची गुणवत्ता उंचावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, कन्स्ट्रक्शन क्वालिटी रेटिंग एजन्सी (CQRA) ने कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल (CIDC) बरोबर भागीदारी करत भारताची पहिली गुणवत्ता मूल्यांकन व ग्रेडिंग प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली जागतिक दर्जा सुनिश्चित करण्यासाठी तसेच देशभरातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी नवीन मानदंड तयार करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे.
ही ग्रेडिंग प्रणाली सर्व प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांवर लागू होईल, ज्यात रस्ते प्रकल्प, पूल व उड्डाणपूल, मेट्रो रेल्वे प्रणाली, रेल्वे, बंदरे आणि इतर जड उद्योग संबंधित रचना यांचा समावेश असेल. प्रकल्पांची गुणवत्ता मोजण्यासाठी एक प्रमाणित चौकट उपलब्ध करून देत, CQRA आणि CIDC पारदर्शकता, जबाबदारी व कार्यक्षमतेत वाढ करण्याचा उद्देश ठेवत आहेत.
ही प्रणाली वैज्ञानिक, निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यांकन पद्धती वापरते, जी बांधकाम गुणवत्तेचे सत्य मूल्यांकन सुनिश्चित करते. याद्वारे निरीक्षणासाठी नमुने निवडताना रँडम सॅम्पलिंग तंत्र वापरले जाते, जे रँडम नंबर जनरेटरसारख्या प्रगत साधनांद्वारे केले जाते. निवडलेले नमुने स्पष्टपणे नोंदवले जातात आणि ऑडिट प्रक्रियेच्या प्रारंभिक बैठकीत सादर केले जातात. निरीक्षणाची माहिती मोबाईल-सक्षम साधनांद्वारे गोळा केली जाते, ज्यामध्ये प्रत्येक त्रुटीचे फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते, ज्यावर तारीख, वेळ व स्थान नमूद केले जाते. निकष हे त्यांच्या परिणामकारकता व वारंवारतेनुसार सौम्य, मध्यम व गंभीर अशा श्रेणींमध्ये पूर्वनिर्धारित केलेले असतात.
प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी त्रैमासिक ग्रेडिंग यंत्रणा
CIDC ने गुणवत्तेचे त्रैमासिक मूल्यांकन पुढील चार प्रमुख निकषांवर आधारित असावे असा प्रस्ताव दिला आहे:
1 संसाधन गुणवत्ता (Resource Quality):
कंत्राटदारांकडून वापरले जाणारे साहित्य आणि उपकरणे तांत्रिक तपशिलांनुसार मूल्यांकन केले जाईल.
- प्रक्रिया गुणवत्ता (Process Quality):
प्रकल्पस्थळी वापरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती व नियंत्रण प्रणालींचा आढावा घेतला जाईल.
- अंतिम उत्पादन गुणवत्ता (Finished Product Quality):
अंतिम संरचना कार्यक्षमतेच्या अपेक्षा व टिकाऊपणाच्या निकषांनुसार तपासली जाईल.
- गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली (QMS):
साइटवरील गुणवत्ता योजनांवर, संघटनात्मक रचना व प्रमुख व्यक्तींच्या जबाबदाऱ्यांवर आधारित मूल्यांकन केले जाईल.
ही ग्रेडिंग प्रणाली विकसक, गुंतवणूकदार व धोरणकर्त्यांना प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत उपयुक्त माहिती प्रदान करेल तसेच पारदर्शकता आणि जबाबदारीला चालना देईल.
ग्रेडिंग खालीलप्रमाणे असेल:
Rating | Grade | Significance |
9 to 10 | A+ | Very Good Quality |
8 to 9 | A | Good Quality |
6 to 8 | B | Need to Improve |
0 to 6 | C | Poor Quality |
CQRA चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. उज्वल कुंटे म्हणाले, “CIDC बरोबर भागीदारी करून ही गुणवत्ता मूल्यांकन व ग्रेडिंग प्रणाली सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही उपक्रम आमच्या धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याचा उद्देश भारतातील बांधकाम गुणवत्तेचेचा दर्जा उंचावणे आहे. त्यामुळे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना उत्कृष्टता व विश्वासार्हतेची उच्चतम दर्जा प्राप्त होइल.”
CIDC चे महासंचालक डॉ. पी. आर. स्वरूप म्हणाले,”या प्रणालीच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय मानके भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात आणत आहोत. प्रगत मूल्यांकन पद्धतींचा वापर करून, आम्ही हे सुनिश्चित करतो की आपले प्रकल्प जागतिक दर्जापेक्षा अधिक गुणवत्ता गाठतात. भारताला इन्फ्रास्ट्रक्चर विकासात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”