शिवापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अँड.मोनिका प्रितेश चांडगे यांची बिनविरोध निवड

Vice Sarpanch of Shivapur Gram Panchayat
Vice Sarpanch of Shivapur Gram Panchayat

पुणे – शिवापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अँड.मोनिका प्रितेश चांडगे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणुकीच्या वेळी पॅनल मधील प्रत्येकाला कालावधी ठरवून दिल्याप्रमाणे या अगोदरचे उपसरपंच राजेंद्र सट्टे यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. त्यासाठी  अँड.मोनिका प्रितेश चांडगे यांचा एकमेव अर्ज आला. त्याला शिवापूर ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांनी त्यास मंजुरी दिली. त्यामुळे  अँड.मोनिका प्रितेश चांडगे यांची शिवापूर गावच्या  उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.  निवडीस सरपंच श्री संजय अण्णा दिघे व ग्रामसेवक मारुती घोळवे यांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली यावेळी ग्रामपंचायतचे इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच श्री सतीश दिघे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री उमेश दिघे व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दिघे उपस्थित होते.

अधिक वाचा  रणधुरंधर शहाजीराजे भोसले' पुस्तकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love