अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं ; 10 लाखही लुटले : फसवणुकीमुळे डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Young doctor commits suicide due to fraud
Young doctor commits suicide due to fraud

पुणे(प्रतिनिधि)– पहिलं लग्न झालेलं असतानाही मॅट्रिमोनियल साईटवर अविवाहित असल्याचं भासवून आणि लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाने २५ वर्षीय डॉक्टर तरुणीची फसवणूक केल्याने विषारी औषधं पिऊन तरुणीने स्वतःच्याच क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पल्लवी पोपट फडतरे (वय २५ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३० वर्ष) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत तरुणीचे पिता पोपट बाबुराव फडतरे यांनी बिबवेवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना बिबावेवाडीतील पीएमटी कॉलनीत सात जानेवारी रोजी घडली होती.

अधिक वाचा  शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो- अमित शहा

पहिलं लग्न झालेलं असतानाही आपण अविवाहित असल्याचं भासवून कुलदीप याने डॉक्टर पल्लवी हिला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर वेळोवेळी तिच्याकडून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल दहा लाख रुपये उकळलं. मात्र एके दिवशी तरुणाने डॉक्टरला आपलं लग्न झालं असल्याचं सांगितलं. इतकंच नाही, तर आपली पत्नी गर्भवती असल्याचंही तो म्हणाला. आर्थिक नुकसान आणि मानसिक धक्का बसल्याने तरुणीने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झालेले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून लग्नासाठी नोंदणी केली. त्यानंतर तो फिर्यादींना भेटला. मात्र त्याचे वागणे पाहून तरुणीच्या पित्याने त्याला नकार कळवला होता. मात्र एवढे होऊनही आरोपी थांबला नाही. मुलीच्या वडिलांना डावलून त्याने थेट पल्लवी हिच्याशी संपर्क साधला.

अधिक वाचा  पौडजवळ हेलिकॉप्टर शेतात कोसळले : हेलिकॉप्टरच्या कॅप्टनसह चारजण जखमी

पल्लवी ही बीएमएचएस झाली असून तिचे तुळजाभवानी सोसायटीत क्लिनिक आहे. पल्लवीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेगवेगळी कारणे सांगून त्याने तिच्याकडून तब्बल दहा लाख रुपयांची रक्कम घेतली. पल्लवीने लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्याने आपलं लग्न झालं असून पत्नी गर्भवती असल्याचं सांगितलं. हे ऐकून पल्लवीला मोठा धक्का बसला. त्यानंतर तिने कुलदीपकडे वेळोवेळी दहा लाख रुपये परत करण्याची मागणी केली. मात्र तो रक्कम परत देण्यासाठी टाळाटाळ करु लागला. याचा मानसिक तणाव सहन न झाल्याने पल्लवीने चिठ्ठी लिहून आपल्या आयु्ष्याची अखेर केली. क्लिनिकमध्येच विषारी औषध प्राशन करुन तिने आत्महत्या केली. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना तिचा आठ जानेवारीला मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  पुण्यातील खूनसत्र सुरूच : मोक्कातील गुंडांकडून तरुणावर वार करून खून : तीन दिवसांत तीन खून

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love