जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात : चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात
जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात

पुणे(प्रतिनिधि)–पुस्तक महोत्सव देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. हा महोत्सव देशाला पुढे नेणारा, पंतप्रधानांच्या संकल्पाला पुढे नेणारा, महाराष्ट्र विकसित करणारा आहे. महाराष्ट्राची उंची वाढत आहे, अशी भावना राज्याचे कॅबिनेटमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. तसेच जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात होईल, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारकडून महोत्सवाला सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला बावनकुळे यांनी सोमवारी भेट दिली. त्या वेळी बावनकुळे बोलत होते. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राघवेंद्र मानकर या वेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, की गेल्यावर्षीही मी या महोत्सवाला आलो होतो. त्यावेळी उत्तम प्रतिसाद असल्याचे पाहिले होते. यंदाचा महोत्सव तर अधिक मोठा आहे, त्यामुळे प्रतिसादही गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. महोत्सवातील तरुणाईचा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तरूण पिढी वाचन करत नाही गैरसमज आहे. आजच्या तरुणाईचा पौराणिक, ऐतिहासिक पुस्तकांकडे तरुणांचा ओढा आहे. या पु्स्तकांच्या वाचनातून ते आपली संस्कृती जपत आहेत. पुस्तक वाचनातून समाज मजबूत होतो. पुस्तकांमुळे माणसाची उंची वाढते. राजकारण्यांनीही वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. राजकारण्यांनी पुस्तके वाचल्यास ज्ञान वाढून समाजातील शेवटच्या अंधाऱ्या घरात उजेड नेता येईल.

अधिक वाचा  #Dr. Mohan Bhagwat : कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध भारत बनवणे हे आपले कर्तव्य - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत 

पुणे पुस्तक महोत्सवासारखा महोत्सव ठाणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथेही झाल्यास तेथील नागरिकांचे पुस्तक प्रेम वाढेल. विभागीय केंद्रांवरही आता लक्ष दिले पाहिजे.  राजेश पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक कार्यक्रम यशस्वी झाले आहेत. मेरा माटी मेरा देश या कार्यक्रमाची देशात चर्चा झाली होती, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

पांडे म्हणाले, की पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचन, पुस्तकाची चळवळ करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दिवसांत पुणेकरांची महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा अधिक पुणेकरांनी भेट दिली आहे, पुस्तकांची खरेदी केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. पुणेकरांनी हा पुस्तक महोत्सव यशस्वी करून दाखवला आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात मांडण्यात आलेली चार वैविध्यपूर्ण दालने लक्षवेधी ठरत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माहिती दालन, ‘वंदे मातरम्’ या गीतावर आधारित दालन, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे दालन आणि ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेटवर आधारित दालनाचा महोत्सवात समावेश असून, महोत्सवाला भेट देणारे पुणेकर या दालनांनाही भेट देत आहेत.

अधिक वाचा  ग्लेनमार्कच्या सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान गोळ्या भारतात आल्यामुळे हृदयविकारावरील उपचाराचा खर्च होणार कमी

महोत्सवात पुण्यश्लोल अहिल्यादेवी होळकर, वंदे मातरम गीत, अभिजात मराठी यावरील खास दालने

या महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात विविध भाषांतील पुस्तकांची सहाशेहून अधिक दालने आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य पदार्थांची मेजवानी मिळत आहे.  महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात चार खास दालनांची मांडणी करण्यात आली आहे.

मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे पुस्तक महोत्सवात अभिजात भाषा दर्जा दालन करण्यात आले आहे. अभिजात भाषा म्हणजे काय, मराठी भाषेचा इतिहास, या दर्जामुळे काय होईल या बाबतची माहिती या दालनात देण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जन्मशताब्दीनिमित्त स्वतंत्र दालन करण्यात आले आहे. या दालनात अहिल्यादेवींनी मंदिर नूतनीकरण, हुंडाबंदी या बाबत केलेले कार्य, त्यांची प्रशासकीय कार्यशैली, होळकर घराण्याचा इतिहास, त्यांच्यावर लिहिले गेलेले ग्रंथ अशा माहिती देण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती: खाटांची कमतरता आणि मृत्युदरात वाढ होणार?

भारत इतिहास संकलन समिती यांच्यातर्फे वंदे मातरम् या गीताच्या १५०व्या वर्षानिमित्त माहितीपूर्ण दालन करण्यात आले आहे. त्यात या गीताचा इतिहास, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके मांडण्यात आली आहे. क्रिकेटवर आधारित ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या दालनामध्ये विस्डेनचे खंड, अनेक क्रिकेटपटूंवरील पुस्तके, ख्रिस गेल, एबी डिविलिअर्स, विराट कोहली, राहुल द्रविड, सचिव तेंडुलकर यांनी वापरलेल्या बॅट, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, व्हिव रिचर्ड्स यांच्या जर्सी, छायाचित्रे पाहायसा मिळतात.

 पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे पुणे पुस्तक महोत्सवात उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, विश्वजित पवार, पवन खेंगरे या वेळी उपस्थित होते. पत्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनातून वर्षभरातील घटनांची आठवण करून दिली, असे बावनकुळे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love