पुणे – सुझलॉन समूह पवन उर्जेच्या क्षमतेचा वापर करून ग्रीनहाऊस उत्सर्जन कमी करण्यास अवघड असलेल्या क्षेत्रांच्या डीकार्बनायझेशनसाठी योगदान देण्यासाठी सज्ज आहे. जेएसपी ग्रीन विंड १ प्रा. लि.कडून (जिंदाल रिन्यूएबल्स पॉवर प्रायव्हेट लिमिटेजची एसपीव्ही) मिळालेल्या ४०० मेगावॉटच्या लक्षणीय कंत्राटाद्वारे हे योगदान दिले जाणार आहे. हे लक्षणीय कंत्राट या क्षेत्रातील सर्वात मोठे सी अँड आय काम असून त्यावरून सुझलॉनचे बाजारपेठेतील आघाडीचे स्थान आणि भारताचे हरित उर्जेच्या दिशेने स्थित्यंतर अधोरेखित झाले आहे. या मोठ्या कंत्राटामुळे सुझलॉनचे एकूण ऑर्डर बुक जवळपास ५.४ जीडब्ल्यूवर गेले आहे.
सुझलॉनद्वारे १२७ अत्याधुनिक विंड टर्बाइन जनरेटर्स (डब्ल्यूटीजी) हायब्रीड लॅटिस ट्युब्युलर (एचएलटी) टॉवर्सच्या माध्यमातून पुरवठा करूणार असून प्रत्येकाची रेटेड क्षमता कर्नाटकातील कोप्पल प्रदेशात ३.१५ मेगावॉटची आहे. त्यातून निर्माण होणारी उर्जा छत्तीसगढ आणि ओडिशातील स्टील प्लँट्सच्या अंतर्गत वापरासाठी वापरली जाणार आहे. पर्यायाने त्यांची कामकाजातील शाश्वतता वाढेल आणि भारताच्या हरित उर्जा उद्दिष्टांना चालना मिळेल.
सुझलॉन समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, ‘कमी- कार्बनच्या भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी, स्टील उत्पादनात क्रांती आणण्यासाठी पवन उर्जेचा वापर करण्यासाठी जिंदाल समूहासह भागिदारीत धाडसी पाऊल उचलताना अभिमान वाटत आहे. या क्रांतीकारी सहकार्यामुळे औद्योगिक शाश्वततेची समीकरणं नव्यानं प्रस्थापित होतील, शिवाय ती भारताच्या २०७० नेट- झिरो व्हिजनशी सुसंगत आहे. एकत्रितपणे आम्ही विकासाला चालना देणाऱ्या शाश्वत पद्धतींमध्ये नवा मापदंड प्रस्थापित करत आहोत तसेच पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहोत.’
जिंदाल रिन्यूएबल्सचे अध्यक्ष भारत सक्सेना म्हणाले, ‘हरित उर्जा सुविधांप्रती आमची बांधिलकी जपण्यासाठी कंपनीतर्फे स्टील उत्पादनात हरित उर्जेचा समावेश केला जात आहे. त्यातून संपूर्ण समूहाचे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास तसेच दीर्घकालीन शाश्वतता जपणे शक्य होईल. या भागिदारीमुळे शाश्वत स्टील उत्पादनात नवी सुरुवात होणार असून २०४७ पर्यंत समूहाची नेट झिरो उद्दिष्टाप्रती बांधिलकी जपता येईल.’
सुझलॉन समूहाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी जेपी चालसान म्हणाले, ‘स्टील क्षेत्रातील डीकार्बनायझेशन अवघड असून भारताचे अक्षय उर्जेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यावर उपाययोजना शोधणे महत्त्वाचे आहे. दोन बलाढ्य भारतीय समूह पुनर्मूल्यांकन आणि स्टील उत्पादन सक्षम करण्यासाठी एकत्र येत असून ही भागिदारी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे. मला खात्री आहे, की ही भागिदारी उद्योग क्षेत्रातील इतर कंपन्यांना त्यांच्या कामकाजाचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रेरणा देईल आणि सर्वांना एकत्रितपणे अधिक शाश्वत भविष्याकडे जाता येईल.’