पुणे(प्रतिनिधि)- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.महायुतीकडून विविध नेते मंडळी राज्यातील विविध मतदार संघात दौरे करून आढावा घेत आहे.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं देखील आजपासून पुणे दौरा सुरू झाला आहे. दरम्यान, “आम्हाला राज्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे” असं बुधवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की आज पक्षाने घालून दिलेल्या कार्यक्रम प्रमाणे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील १५० पदाधिकारी,कार्यकर्ते यांची बैठक झाली असून अतिशय उत्तम अशी ही आजची बैठक झाली आहे.मी गेले काही दिवस महाराष्ट्रमध्ये पक्षाने जी जबाबदारी दिली आहे तिथं जाऊन दौरा करत आहे.कार्यकर्त्यांच्या मध्ये खूपच जास्त उत्साह पाहायला मिळत आहे.जिथं कुठं जात आहे तिथं लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा होत आहे.या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.महायुती म्हणून आम्ही सक्षमपणे काम करणार आहोत.अस यावेळी मुंडे म्हणाल्या.
भाजपमधील अनेक लोक हे राष्ट्रवादी काम करणार नाही अस सांगत आहे याबाबत मुंडे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “या कार्यकर्ताच्या भावना आहेत. हे नैसर्गिक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मतदार संघ हा आपल्याला मिळावा. पण याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेणार आहेआज कार्यकर्ते जी भावना व्यक्त करत आहे त्यात कुठेही गैर नाही.भाजपाचा कार्यकर्ता हा अतिशय शिस्तप्रिय आहे. पक्षाचा आदेश आल्यास महायुतीचे काम करणार आहे.अस यावेळी मुंडे म्हणाल्या.