वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून पोलिसांनी 13 जणांना घेतले ताब्यात : संशयित मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडसह तिघांना 9 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून पोलिसांनी 13 जणांना घेतले ताब्यात
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून पोलिसांनी 13 जणांना घेतले ताब्यात

पुणे(प्रतिनिधि)- पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणी पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आरोपींच्या मुसक्या आवळत १३ जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय पोलिसांना असून, गायकवाडसह आंदेकरांची बहीण संजीवनी कोमकर, तिच्या दिराला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले. आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आंदेकर यांचा रविवारी रात्री (१ सप्टेंबर) नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. प्राथमिक तपासात बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी आंदेकर यांचे वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाल्याची माहिती मिळाली. आंदेकरांच्या सांगण्यावरुन दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खूनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फोडली कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने

गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे, त्याचा मित्र शुभम दहिभाते यांच्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत हल्ला करण्यात आला होता. कोयता, स्कू-ड्रायव्हरने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. हल्ल्यात आखाडे याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. आखाडेचा खूनाचा बदला घेण्याचा तयारीत सोमनाथ होता. संजीवनी, प्रकाश, गणेश, जयंत यांच्याशी संगनमत करून सोमनाथने आंदेकरांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

खून प्रकरणात सुरुवातीला संजीवनीचा पती जयंत, दीर गणेश यांना अटक करण्यात आली. त्यानंतर संजीवनी (वय ४४), दीर प्रकाश (वय ५१, दोघे रा. नाना पेठ)आणि पसार झालेल्या सोमनाथ (वय ४१, सध्या रा. आंबेगाव पठार, धनकवडी, मूळ रा. अशोक चौक, नाना पेठ) याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने तिघांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अनिकेत दूधभाते, तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार (तिघे रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ), समीर उर्फ सॅम काळे यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

अधिक वाचा  बॉम्बने पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी

आंदेकरांवर पाळत

वनराज आंदेकर यांच्यावर पाळत ठेवून आरोपींनी खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात आंदेकर दररोज सायंकाळी थांबतात,याची माहिती आरोपींना होती. आंदेकरांची बहीण संजीवनीने आरोपींना चिथावणी दिली होती. आरोपींनी पिस्तूल कोठून आणले, तसेच पसार झालेल्या आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने सरकारी वकिलांनी आरोपी संजीवनी, प्रकाश, सोमनाथला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

आणखी १३ जणांना घेतले ताब्यात

पोलिसांनी सोमवारी या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती. आता यामध्ये आणखी १३ जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी काही जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

रविवारी रात्री नऊच्या सुमारास पुण्यातील नाना पेठ मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना या १३  जणांनी घेऊन त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. तसेच कोयत्याने देखील वार केले होते. यामध्ये आंदेकर यांना एकही गोळी लागली नाही मात्र वैद्याने केलेल्या वार मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटनास्थळावरून या आरोपींनी पळ काढला होता. मात्र दोन दिवसानंतर पोलिसांनी ताम्हीनी घाटामधून तेरा जणांना ताब्यात घेतले आहे.जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते, जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

अधिक वाचा  #कल्याणीनगर 'हीट अँड रन'प्रकरण : हॉटेल कोझी आणि ब्लॅक क्लबला ठोकले टाळे

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love