महायूतीचे हे 9 बडे नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत ?

महायूतीचे हे 9 बडे नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत ?
महायूतीचे हे 9 बडे नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत ?

पुणे(प्रतिनिधि)—जेष्ठ नेते शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. तो धक्का नगर जिल्ह्यात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे विवेक कोल्हे हे हातात तुतारी घेऊन आगामी  विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या तयारीत असल्याच्या शक्यतांना मंगळवारी पुण्यामध्ये पुष्टी मिळाली आहे.

पुण्यातील मांजरी येथे मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार आणि इतर नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकी दरम्यान  विवेक कोल्हे हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार आणि विवेक कोल्हे यांनी एकत्रित जेवण केले. तसेच त्यांची बैठकही झाली. विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शरद पवार त्यांच्या गाडीतून निघाले. त्यावेळी विवेक कोल्हे बाजूला उभे असताना शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत बसण्याची सुचना केली त्यानंतर कोल्हे हे पवारांच्या गाडीत बसून रवाना झाले. त्यामुळे आगामी विधानसभा विवेक कोल्हे राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळाली आहे.

विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपच्या माजी आमदार  आहेत. परंतु २०१९ मध्ये त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळे हा पराभव झाल्याचा कोल्हेंचा आरोप आहे. तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

अधिक वाचा  भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ?- राजू शेट्टी

नुकत्याच झालेल्या  नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमदेवार किशोर दराडे यांच्या विरोधात विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांनी दराडे यांना जोरदार टक्कर दिली मात्र, त्यांचा पराभव झाला. सध्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रावादीच्या फुटीनंतर अजित पवार गटामध्ये गेले आहेत. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुतीसोबत आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असे काळेंनी अनेकदा बोलून दाखवले आहे. आज विवेक कोल्हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी धक्का देत काही मासे गळाला लावले. तीच रणनीती ते विधानसभेसाठी आखत आहेत. राज्याच्या विविध भागातील अजित पवार गटातील आमदार, भाजपमधील नाराज नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची विवेक कोल्हे यांनी मंगळवारी घेतलेली भेट म्हणजे शरद पवार यांचा भाजपला आणि एक धक्का असल्याचे मानले जात आहे.

अधिक वाचा  पुण्याच्या पुराला साबरमती प्रकल्पाचे अनुकरण जबाबदार : मुठा नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला मार्जिन लोन नाकारले

राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून कोट्यवधींचे मार्जिन लोन दिले. महायुती सरकारने या कर्जाची थकहमी घेतली आहे. दरम्यान, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला वगळण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधामुळे कोल्हेंच्या कारखान्याला १२५ कोटी नाकारण्यात आल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मदत केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि कर्ज नाकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हर्षवर्धन पाटीलही घेणार तुतारी हाती?

राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनीही मंगळवारी शरद पवारांची भेट घेतली. वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधली बैठक संपल्यानंतर त्या दोघांची बैठकही झाली. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलही तुतारी हातात घेणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, आज बैठकीमध्ये संस्थेच्या संदर्भातील चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी साखर कारखारण्यासंदर्भात जागेसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार गटात प्रवेश करण्यासंदर्भात कोणती चर्चा झाली नाही.

अधिक वाचा  विधानसभेला अजित पवार यांना शह देण्याच्या शरद पवार तयारीत? काढताय बारामती तालुका पिंजून

तीन आठवड्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. ते काय निर्णय घेता ते पाहावं लागेल. आम्ही लोकांच्यात असतो. कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीच्या जागावाटपात अंतिम निर्णय झाला नाही. त्या कमिटीत मी नाही. मी कोअर कमिटीत आहे. त्यात तरी जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही. महायुतीच्या संदर्भातील निर्णय फक्त भाजप घेणार नाही. राहिला प्रश्न इंदापूरचा तर कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. हे पाहून वरिष्ठ निर्णय घेतील.महायुतीत जागावाटपाचा निर्णय झालेला नाही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.कार्यकर्ते म्हणत आहेत की आपल्याला महायुतीच तिकीटच मिळालं पाहिजे. काही म्हणतात अपक्ष उभे राहा मात्र ही कार्यकर्त्यांची चर्चा आहे याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

९ बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत?

लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धारण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love