मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सची महाराष्ट्रात ४६ टक्के जीडब्ल्यूपी वाढीची नोंद

ManipalSigna Health Insurance records 46 percent GWP growth in Maharashtra
ManipalSigna Health Insurance records 46 percent GWP growth in Maharashtra

पुणे – आरोग्य विमा क्षेत्रातील मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सने पश्चिम क्षेत्रात दमदार वाढ केली आहे. कंपनीने वित्त वर्ष २०२३- २४ मध्ये ५०० कोटी रुपयांचे ग्रॉस रिटेन प्रीमियम ( (Gross Written Premium – जीडब्ल्यूपी) मिळवून ४६ टक्के वाढ साध्य केली आहे, अशी माहिती मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर सपना देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपल्या नाविन्यपूर्ण आरोग्य विमा उत्पादनाच्या माध्यमातून कंपनी नवीन ग्राहक वर्गापर्यंत पोहोचत आहे. भारताच्या पश्चिमेकडे राज्यांमध्ये कंपनीची झपाट्याने वाढ होताना दिसून येत असून वित्त वर्ष २०२३ – २४ मध्ये कंपनीच्या ग्रॉस रिटेन प्रीमियममध्ये (Gross Written Premium – जीडब्ल्यूपी) पश्चिम क्षेत्राचा ३५ टक्के वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स या आरोग्य विमा कंपनीकडे १२,००० पेक्षा जास्त आरोग्य विमा सल्लागार असून आपल्या मजबूत अशा मल्टीचॅनेल वितरण जाळ्याच्या माध्यमातून ते संपूर्ण क्षेत्रात पसरले आहेत. या स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीकडे महाराष्ट्रात १७०० पेक्षा अधिक रुग्णालयांचे जाळे आहे. राज्यात आपल्या विस्ताराचा एक भाग म्हणून पुढील बारा महिन्यात पिंपरी, सातारा, नागपूर आणि रत्नागिरी येथे नवीन शाखा कार्यालय उघडण्याची तसेच २५०० सल्लागार बाळगण्याची मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सची योजना असल्याचे देसाई यांनी नमूद केले.

अधिक वाचा  पालकांनी पुढील पिढी संस्कारित होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी-साहित्यिका मंगला गोडबोले

सपना देसाई म्हणाल्या, “राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९- २१ च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील केवळ २२ टक्के कुटुंबामध्ये घरातील किमान एका सदस्याचा आरोग्य विमा काढलेला आहे. यातून राज्यामध्ये आरोग्य विमा क्षेत्रातील एक मोठी पोकळी अधोरेखित होते. आरोग्य विमा हा किफायतशीर, सहज आणि अपेक्षित करून आरोग्य विम्याच्या उपलब्धतेची दरी भरून काढणे हे मणिपालसिग्नामध्ये आमचे ध्येय आहे. आमच्या विशिष्ट आरोग्य विमा उत्पादनासह व आमच्या व्यापक अशा वितरण जाळ्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या नवीन उद्भवणाऱ्या तसेच विविध आरोग्य विमा वित्त पुरवठ्याच्या गरजा भागविण्याचे आमचे ध्येय आहे.”

उत्पादने व संचालन विभागाचे प्रमुख आशिष यादव म्हणाले, “ग्राहकांच्या आरोग्य विम्याशी संबंधित विशिष्ट अशा गरजा पूर्ण करण्यासाठी मणिपालसिग्नाकडे अनेक ग्राहक केंद्रित उत्पादने आहेत. मणिपालसिग्ना प्रोहेल्थ प्राईम योजना हे असेच एक उत्पादन असून ते “अवैद्यकीय खर्च“ (नॉन मेडिकल एक्सपेंसेस) अशा नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यासह येते. रुग्णालयात असताना अवैद्यकीय गोष्टींसाठी खिशातून खर्च करण्याची जराही गरज भासू नये, याची हमी त्यातून मिळते. या योजनेमुळे ग्राहकांना अधिक चांगले कव्हरेज, अधिक नियंत्रण आणि अधिक काळजी मिळतात. याशिवाय त्यात मुख्यतः खिशातून खर्च कराव्या लागणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला, निदान करण्यासाठीच्या चाचण्या आणि औषधांचा खर्च, १०० टक्क्यांपर्यंत अमर्यादित रेस्टोरेशन अशा गोष्टींसाठी रोकड रहित ओपीडीचा (कॅशलेस ओपीडी) तसेच इतर अनेक आकर्षक लाभांचा समावेश आहे. मणिपालसिग्ना प्रोहेल्थ प्राईम मधुमेह, लठ्ठपणा, दमा, उच्च रक्तदाब तसेच अधिक कोलेस्ट्रॉल अशा व्याधी असलेल्या व्यक्तींसाठी आहे.”

अधिक वाचा  असा तयार झाला बलबीर सिंग : मेगास्टार अनिल कपूर यांच्या अ‍ॅनिमलमधील बलबीर सिंगच्या लूक मागची ही खास गोष्ट

आपल्या वैयक्तिक उत्पादनांचा भाग म्हणून मणिपालसिग्ना लाइफटाईम हेल्थ प्लॅन सर्वसमावेशक आरोग्य सेवा वित्तपुरवठा करते. यात यात ५० लाख रुपयांपासून ते तीन कोटी रुपयांपर्यंत विमा रकमेचे पर्याय असून यात देशांतर्गत तसेच जागतिक आरोग्य सेवा गरजांचा समावेश आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी मणिपालसिग्ना प्राईम सीनियर प्लॅन खास पुण्यात राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तींसाठी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये देते. प्राईम सीनियर प्लॅन ज्येष्ठ नागरिकांना त्रासमुक्त लवचिकतासुद्धा प्रदान करते. यात आधीच असलेल्या व्याधींसाठी ९१ व्या दिवसापासून कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय कव्हरेज मिळते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत्या वयात दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकते.

आपल्या नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित उत्पादनांसह मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स ही भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक म्हणून उठून दिसते. ती लोकांच्या आरोग्याच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते आणि ग्राहकांच्या आरोग्यसेवा वित्त पुरवठा बाबतच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सर्वांगीण कव्हरेज देते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love