Attack On Ayodhya : सालार मसूदच्या (Salar Masud) पाडावानंतर अयोध्येवर अनेक हल्ले होत राहिले. मुहम्मद घोरीचा (Muhommad Ghori) धाकटा भाऊ मकदूमशाह जुर्रन घोरी (Makdoomshah Jurran Ghori) याने पुढच्या काळात इ. स. ११९२ मध्ये अयोध्येवर (Ayodhya) हल्ला केला. गढवाल राजांचा सामंत म्हणून बर्तू किंवा भरतु किंवा भर्तृहरी नामक एक कारभारी अयोध्येचा कारभार पहात होता. त्याने जुर्रन् घोरी याच्या प्रचंड सेनेशी संघर्ष केला, अनेक वर्षे हा संघर्ष चालला. भर्तृहरीच्या पराक्रमापुढे जुर्रन घोरीचे काही चालले नाही. (Ghori’s attack on Ayodhya failed)
प्रचंड सैन्य बरोबर असताना सुद्धा केवळ जैन पंथाचे पहिले तीर्थंकर आदिनाथ ऋषभदेव(Adinath Rishabhadev) यांचे मंदिर उध्वस्त करण्यात जुर्रन घोरीला यश मिळाले, परंतु तो अयोध्या काही जिंकू शकला नाही. या युद्धात तो तेथेच मारला गेला असावा, कारण आज अयोध्येमध्ये ‘शाह र्जुरन का टिला’ या नावाने त्याची कबर ओळखली जाते. नंतरच्या काळात गुलाम, तुघलक, खिलजी व त्यांच्या वंशाच्या भारतावरील आक्रमणांची मालिका सुरूच राहिली, परंतु यातील कोणीही अयोध्येवर हल्ला केला नाही, त्यामुळे पुढील बराच काळ अयोध्येच्या दृष्टीने शांततेचा गेला.
– डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६