पुणे(प्रतिनिधि)—माजी खासदार श्री सुरेशजी कलमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली‘पुणे फेस्टिव्हल’ सातत्याने विकसित होत असून त्याला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘’पुणे फेस्टिवल” हा एक चैतन्यशील सांस्कृतिक उत्सव आहे जो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) हे अखिल भारतीय मुशायराचे आयोजन करत आहेत. (‘All India Mushaira’ under Pune Festival 2023)
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सुरेशजी कलमाडी डॉ. पी.ए. इनामदार (कुलपती, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार(अध्यक्ष,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) यांच्या वतीने शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८:३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे येथे अखिल भारतीय मुशायरा आयोजित करण्यात येणार आहे.
या मुशायरात सहभागी होण्यासाठी देशातील नामवंत शायरांना जसे की – डॉ. मंजर भोपाली (भोपाळ), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकवी (लखनौ), अबरार काशिफ (अकोला), सरदार सलीम (हैदराबाद), सागर त्रिपाठी (वाराणसी), डॉ. कासिम इमाम (मुंबई) फरहान दिल (मालेगाव) अब्दुल हमीद हुनर आणि शाहनवाज काजी सईल इत्यादिंना आमंत्रित करण्यात आले आहे.