भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणाऱ्या 34 व्या डिपेक्सचे गुरुवारी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन : मुख्यमंत्रीही देणार भेट

34th Deepex inaugurated by Ajit Pawar on Thursday
34th Deepex inaugurated by Ajit Pawar on Thursday

पुणे(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी बनवलेले नवीन संशोधन, प्रकल्प आणि तांत्रिक नवकल्पनांचा महाकुंभ असलेल्या डिपेक्स 2025 या प्रदर्शनाचे 3 ते 6 एप्रिल या कालावधीत पुण्यातील सीओईपी मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, डीआरडीओचे माजी अध्यक्ष जी सतीश रेड्डी, एआयसीटीईचेअरमन टी जी सीतारामन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय महामंत्री डॉ.वीरेंद्र सिंह सोलंकी उपस्थित राहणार आहेत.

डिपेक्स 2025 मध्ये सहभागकर्त्यांसाठी एकूण नऊ परिसंवादांचे , सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे हे सेमिनार नामांकित  उद्योजक  घेणार आहेत , सेमिनारसाठी पद्मश्री मिलिंद कांबळे, उद्योजक  सुधीर मुतालिक, डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, प्राध्यापक विजय नवले, रामानंद नंद यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळविला- आमदार डॉ. सुधीर तांबे

सर्व अकरा थीम मध्ये प्रथम व द्वितीय पुरस्कार दिले जाणार आहेत,  या व्यतिरिक्त काही आकर्षक पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहेत.

डिपेक्स 2025 स्वागत समितीचे अध्यक्ष  प्रकाश धोका, कुलगुरू सुनील भिरुड ,स्वागत समिती सचिव प्रसेंजित फडणवीस, रवींद्र शिंगणेकर, स्वागत समितीचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, डॉ.प्रशांत साठे , अभावीपचे अथर्व कुलकर्णी हे उपस्थित होते.

यावेळी, डिपेक्सचे स्वागत समिती अध्यक्ष प्रकाश धोका म्हणाले की, भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे डिपेक्स यावर्षी पुण्यात पार पडत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये डिपेक्सने विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

डिपेक्स स्वागत समिती सचिव प्रसेनजित फडणवीस म्हणाले की, हा डिपेक्स महाराष्ट्र व गोवा राज्यातील निवडक प्रकल्पांचा एक महाकुंभ आहे असे आपण म्हणू शकतो. याच मैदानावर १२ वर्षांपूर्वी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीमध्ये हा डिपेक्स पार पडला होता. या डिपेक्स मध्ये खऱ्या अर्थाने समाजाभिमुख विषयांवर विज्ञान, तंत्रज्ञान भूमिका व शाश्वत विकास याबाबत विचारमंथन होणार आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या भीमथडी अश्वांना आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता

यावर्षीच्या ३४व्या डीपेक्स मध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण २००३ प्रोजेक्ट्स सहभागी झाले होते यामधून ११ विभागात झालेल्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या सर्वोत्तम ४०० प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या नगर, सीओईपी कॉलेज मैदान, पुणे येथे होणार आहे. .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love