दहशदवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पुण्यातील दोन संशयितांना अटक – तरुणीचा समावेश


दहशदवादी  कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पुण्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि पुणे एटीएस ने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

सादिया अन्वर शेख (वय २१, रा़ येरवडा) आणि नबील सिद्दिकी खत्री (वय २७, रा़ कोंढवा)  असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

इस्लामीक स्टेट खोरसान या ग्रुपशी हे तरुण संबंधित असल्याची माहितीही पुढे येत आहे. अतिरेक्यांच्या स्लिपर सेलमध्ये हे सहभागी असून त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळवून देणं, स्थानिक आश्रय देणं, पैसा पुरवणं आणि दहशतवादी संघटनांमध्ये नव्या तरुणांची भरती करणं अशी अनेक कामं हे तरुण करत असतात. नबील खत्री हा कोंढव्यात जीम ट्रेनर म्हणून काम करतो. सादिया शेख याला ती अल्पवयीन असल्यापासून इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याकरिता अभाविपचे बेमुदत उपोषण

सादिया  पुण्यातील येरवडा परिसरात राहत होती. पुण्यातील एका महाविद्यालयात तिने पत्रकारितेच शिक्षणही घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर नबील दिल्लीतील एका अति संवेदनशील प्रकरणात सहभागी असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, दोघांनाही अटक करून त्यांची चोकशी सुरू असल्याची माहिती अधीकाऱ्यांनी दिली आहे. या दोघांकडून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी दिल्लीतील जामिया नगर परिसरातून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन मार्च महिन्यात एका डॉक्टर दांपत्याला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत नबील खत्री आणि सादिया शेख यांचे नाव पुढे आले. त्यानंतर एनआयएने या दोघांवर नजर ठेवली होती. ते पुण्यात स्लिपर सेल म्हणून काम करत असल्याचे त्यांच्या तपासात दिसून आल्यावर दिल्लीतून एनआयएचे पथक थेट पुण्यात येऊन धडकले. त्यांनी राज्य दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस येथे कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत.

अधिक वाचा  मनविसेच्या वतीने जय श्रीराम राजा राम.. च्या जयघोषात 'शैक्षणिक भ्रष्टाचारा'च्या रावणाचे दहन

एनआयए ने गुप्त माहितीच्या आधारे यांना अटक केली आहे. या दोघांचा अनेक कृत्यात सहभाग असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.  एनआयए आता या दोघांची कसून चौकशी करणार आहे. दिल्लीतल्या काही संवेदनशील प्रकरणात यांचा सहभाग असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love