जिओ भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क लॉन्च करणार, गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार -मुकेश अंबानी


जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार

 मुंबई- देशातील दिग्गज कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची  43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सभेमध्ये  गुगलच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे, जिओ मार्ट लाँच करणे, 5 जी सेवेची चाचणी सुरू करणे यासारख्या अनेक मोठ्या घोषणा अंबानी यांनी केल्या. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली तर जिओ पुढील वर्षी संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क लॉन्च करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

यंदा कोरोना विषाणूमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. एजीएम सुरू होण्यापूर्वी मुकेश अंबानी यांनी त्यांचे सर्व भागधारकांचे स्वागत व आभार मानले.

अधिक वाचा  डिजिटल इंडियाचा उदय: तंत्रज्ञानामुळे भारत कसा बदलत आहे

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती यावेळी अंबानी यांनी दिली आहे. या गुंतवणूकीद्वारे गुगल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 7.7 टक्क्यांची हिस्सेदारी घेईल. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये लॉकडाउनदरम्यान गेल्या तीन महिन्यांत झालेल्या एकूण गुंतवणूकीचा आकडा 1 लाख 52 हजार 056 कोटी रुपये होईल.

गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार असल्याचंही रिलायन्सनं जाहीर केलं आहे. अंबानी म्हणाले, हे स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असतील. मुकेश अंबानी म्हणाले की, आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लाइव्ह फोनची विक्री झाली आहे. परंतु तरीही फीचर फोन युजर्स स्मार्टफोन येण्याची वाट पाहत आहेत. आमचा विश्वास आहे की आम्ही एन्ट्री लेव्हलला 4जी आणि 5जी स्मार्टफोन बनवू शकतो.

अधिक वाचा  नवीन वर्षात तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे होणार हे मोठे बदल

आम्ही असा फोन डिझाइन करू शकतो, ज्याची किंमत सामान्य स्मार्टफोनपेक्षा कमी असेल. तसेच गुगल आणि जिओ मिळून एक व्हॅल्यू इंजिनियर्ड अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

या कराराबाबत बोलताना, “गुगलसोबतच्या भागीदारीद्वारे भारताला 2G मुक्त करु” असे मुकेश अंबानी म्हणाले. तर, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकापर्यंत इंटरनेट पोहोचायला हवं, जिओसोबत भागीदारी केल्यामुळे जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचता येईल याचा आनंद वाटतोय” अशी प्रतिक्रिया पिचाई यांनी दिली आहे.

भारतात पुढील वर्षी 5G लॉन्च करणार

जिओ पुढील वर्षी संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क लॉन्च करणार आहे. 5G चे परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लॉन्च करण्यास जिओ सज्ज आहे. जिओ हे तंत्रज्ञान जगभरात पोहवण्यासाठीही कटिबद्ध असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love