पुण्यातील राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची लैंगिक अत्याचार करून हत्या

Two girls sexually assaulted and murdered in Rajgurunagar
Two girls sexually assaulted and murdered in Rajgurunagar

पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मोलमजुरीसाठी आलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून पाण्याच्या बॅरलमध्ये बुडूवून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने राजगुरुनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.

ही घटना राजगुरूनगर येथील वाडा रस्त्यावर घडली. खून केल्यानंतर आरोपी पुण्यात पळून आला आणि एका लॉजमध्ये लपला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. कार्तिकी सुनिल मकवाने (वय ९) आणि दुर्वा सुनिल मकवाने (वय ८) अशी खून झालेल्या मुलींची नावे आहेत.पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय ५४  वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. अजय दास असे नराधम आरोपीचे नाव आहे. नराधम आरोपीने मुलींचा खुन करुन परराज्यात पळून जात असताना  पुणे  ग्रामीण पोलीसांनी पुण्यातून आरोपीला अटक केली आहे.  आरोपी आचारी म्हणून काम करतो. या मुलींचे वडील राजगुरुनगर लगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी असुन पत्नी मोलमजुरी करते.

अधिक वाचा  शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार?

याबाबत सविस्तर  माहिती अशी, की राजगुरुनगर येथे वास्तव्यास असलेल्या भटक्या गोसावी समाजातील दोन अल्पवयीन आठ व नऊ वर्ष वयाच्या मुली घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत संबंधित पालकांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी पीडित कुटुंब वास्तव्य असलेल्या ठिकाणी शोधाशोध सुरु केली असता या दोन्ही मुली जवळच असणाऱ्या इमारतीच्या बाजूला पाण्याच्या बॅरलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी अधिक तपास केला असता या मुलींपैकी एकीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. त्यानंतर जवळच बिअर बारमध्ये काम करत असलेल्या परप्रांतीय वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने हे कृत्य केले असल्याचे कबूल केले आहे.  राजगुरुनगर शहराला काळीमा फासणाऱ्या या घटनेने विविध संघटना पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढे सरसावल्या असून आरोपीस जलदगतीने खटला चालवून तत्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

अधिक वाचा  'हीट अँड रन’ प्रकरणाच्या तपासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार

——————————————-

 

घडलेली घटना निर्दयी, निर्घृण असून माणुसकीला न शोभणारी आहे. लोकप्रतिनिधी या नात्यानें आपल्या तालुक्यात अशा घटना घडू नये म्हणून गुन्हेगाराला चपराक मिळायला पाहिजे, फास्ट ट्रकच्या माध्यमातून खटला चालून आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मताशी मी सहमत आहे.

आमदार बाबाजी काळे

——————————————–

भाडेकरू ठेवताना त्याची माहिती पोलीस चौकीमध्ये दिली पाहिजे, यापुढे घर lमालकांनी माहिती लपविल्यास सदर मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

शहरातील ज्या भागात असुरक्षितता वाटत असेल, त्या ठिकाणी पोलीस गस्त ठेऊ.

अप्पर पोलीस अधीक्षक  —   रमेश चोपडे

————————

सामाजिक,राजकीय,आर्थिक,शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या  भटक्या विमुक्त समाजावर शासनाने सतत अन्याय केला आहे.राजगुरुनगर शहराला काळीमा फासणाऱ्या या घटनेची शासनाने  दखल घेतली पाहिजे व या समाजाला एट्रोसिटी कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे. तसेच शासनाने आरोपीस हैद्राबाद पॅटर्न राबवून  पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे.

अधिक वाचा  लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा लॉजवर ओढणीने गळा आवळून खून

भटक्या विमुक्त समाज,राष्ट्रीय अध्यक्ष

संजय कदम

———————–

शासनाने आश्वासन न देता पीडित कुटुंबाला न्याय देऊन एक कोटीची आर्थिक मदत द्यावी. सदर घटनेचा भीमशक्ती, खेड तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करीत आहे.

विजय डोळस

भीमशक्ती, पुणे जिल्हा अध्यक्ष

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love