gtag('js', new Date());
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
शोधा
Wednesday, September 10, 2025
  • जाहिरातीसाठी संपर्क
 News24Pune
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
मुख्य पृष्ठ महत्वाच्या बातम्या पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -१)
  • महत्वाच्या बातम्या
  • लेख

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -१)

प्रतिनिधी
News24Pune
-
June 19, 2025
शेअर
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Linkedin
Telegram
    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
    Spread the love

    Post Views: 83

    महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण-घडण करण्याचे कार्य प्रमुख पाच भक्ती संप्रदायांनी केले. नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय* हे पाच प्रमुख संप्रदाय होते. या संप्रदायाच्या प्रेरणेतूनच मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाड्मयाची निर्मिती झाली. या प्रत्येक संप्रदायाचा प्रभाव कमी -अधिक प्रमाणात समाज मनावर झाल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृती व वाड्मय विश्वाचे भरण- पोषण करणारा प्रमुख संप्रदाय म्हणून नाथ संप्रदाय ओळखला जातो तर सकृतदर्शनी अवैदिक वाटला तरी गीता,भागवत, श्रीकृष्ण आणि दत्त यांना पूजास्थानी मानणारा संप्रदाय म्हणून *महानुभाव संप्रदाय* ओळखला जातो, वैदिक परंपरेतील अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानावर स्थित असणारा उपासना मार्ग म्हणून ओळखला जाणारा संप्रदाय म्हणून दत्त संप्रदाय ओळखला जातो, समाजाच्या अज्ञानातून निर्माण झालेले जडमूढतेचे हीण भस्मसात करून टाकण्यासाठी सर्व गुणांचा आदर्श अशा पुरुषार्थी प्रभूरामचंद्रासारख्या दैवताच्या उपासनेचा पुरस्कार करणारा संप्रदाय म्हणून समर्थ संप्रदाय ओळखला जातो तर समाजातील परस्परविरोधी आणि विपरीत अशा वृत्तींना भक्ती सारख्या उदात्त व सर्वस्पर्शी लाटेत सामावून घेत सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे ही भावना रुजविणारा म्हणून वारकरी संप्रदाय ओळखला जातो

    अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास : भाग - ३

    महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय या पाच संप्रदायांनी आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही वारकरी संप्रदाय वगळता अन्य चार संप्रदायांना मर्यादित यश लाभल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाला स्थान न देता सहज-सोप्या भक्तीच्या मार्गाने समाजमनाचे भरण-पोषण करणाऱ्या वारकरी संप्रदायाला समाजाने स्वीकारले. वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्या कीर्तन – प्रवचन,वाड्मयातून व आपल्या आचार – विचारातून समतेचा संदेश दिला. समाजातील भेद दूर केले व अठरापगड जातींमध्ये चैतन्य निर्माण केले. वेगवेगळ्या उपासना पद्धतीला फाटा देऊन नामस्मरणाच्या माध्यमातून सहज – सुलभ भक्ती करण्याची शिकवण समाजाला दिली. आजपर्यंत कर्मकांडात अडकलेला धर्म व संस्कृत भाषेत अडकलेले धर्माचे तत्वज्ञान संतांनी मुक्त केले. आचरण्यास सहज-सोपा असणारा आचारधर्म सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाला लोकांनी मनापासून स्वीकारले, त्यामुळेच मध्ययुगीन कालखंडापासून हा संप्रदाय वाढतच गेला. आज आठशे ते हजार वर्षांनंतरही आधुनिक काळातही तो वाढतानाच दिसतो आहे. (क्रमशः)

    अधिक वाचा  पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास(भाग ५)

      -डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

                मो. क्र. ७५८८२१६५२६.

    Like
    100% LikesVS
    0% Dislikes

    Spread the love
    • टॅग
    • कर्मकांडविरहित भक्ती (Ritual-free Devotion)
    • दत्त संप्रदाय (Datta Sampradaya)
    • नाथ संप्रदाय (Nath Sampradaya)
    • नामस्मरण (Namaskar)
    • मध्ययुगीन कालखंड (Medieval Period)
    • मराठी वाड्मय (Marathi Literature)
    • महानुभाव संप्रदाय (Mahanubhav Sampradaya)
    • महाराष्ट्र भक्ती संप्रदाय (Maharashtra Bhakti Sampradaya)
    • वारकरी संप्रदाय (Warkari Sampradaya)
    • समर्थ संप्रदाय (Samarth Sampradaya)
    • सामाजिक समता (Social Equality)
    मागील बातमी खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!
    पुढील बातम्या मराठी शक्ती एकवटू नये म्हणून मालकांचे नोकर प्रयत्नशील : “राज्याच्या मनात आहे तेच मी करेन,” उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान
    News24Pune
    https://news24pune.com

    संबंधित बातम्या अधिक बातम्या

    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल ३२ तासानंतर सांगता
    पुणे-मुंबई

    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल 35 तासानंतर सांगता : मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळाच्या गणपतींना पुणेकरांचा भावपूर्ण निरोप

    मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही
    महत्वाच्या बातम्या

    ‘इंग्रजांची नीती आमची नाही’: मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही – देवेंद्र फडणवीस

    GST Council Meeting
    अर्थ

    जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय : कर रचना सुटसुटीत : काय काय होणार स्वस्त?

    Follow Us

    [slide-anything id=”13045″]

    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल ३२ तासानंतर सांगता

    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल 35 तासानंतर सांगता : मानाच्या पाच...

    September 7, 2025
    मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही

    ‘इंग्रजांची नीती आमची नाही’: मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार...

    September 7, 2025
    GST Council Meeting

    जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय : कर रचना सुटसुटीत...

    September 4, 2025
    Personal health and life insurance now exempt from Goods and Services Tax (GST)

    आनंदाची बातमी : वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा आता वस्तू व...

    September 4, 2025
    Atharvashirsha recitation and Mahaaarti by 35,000 women in front of 'Dagdusheth' Ganesha

    दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

    August 28, 2025
    राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://news24pune.com/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत.
    महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
    संपर्क करा: [email protected]

    POPULAR POSTS

    On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati

    पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला

    July 6, 2024
    Encroachment action by railway administration in Bhushi Dam area

    भुशी धरण परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई : शेकडो कुटुंब रस्त्यावर 

    July 2, 2024
    798 mm of rain in Lonavala in 3 days

    3 दिवसांत लोणावळ्यात तब्बल 798 मिमी पाऊस : पूरस्थितीमुळे पर्यटकांना पर्यटनाकरिता...

    July 25, 2024

    POPULAR CATEGORY

    • पुणे-मुंबई1875
    • राजकारण1263
    • महाराष्ट्र706
    • महत्वाच्या बातम्या619
    • क्राईम380
    • शिक्षण199
    • लेख185
    • आरोग्य134
    • देश-विदेश120
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    © Copy Right@News24Pune
    महत्वाच्या बातम्या

    पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -१)

    by News24Pune time to read: <1 min
    महत्वाच्या बातम्या मराठी शक्ती एकवटू �…
    पुणे-मुंबई खडकवासला धरणातून व…
    • 0
    • 0
    • 0
    0
    अधिक गोष्टी
    Atharvashirsha recitation and Mahaaarti by 35,000 women in front of 'Dagdusheth' Ganesha

    दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

    August 28, 2025
    राज्यात थंडीचा कडाका वाढणार

    राज्यात थंडीचा कडाका वाढणार

    December 9, 2024
    ×

    No WhatsApp Number Found!

    WhatsApp us