सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर:खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती […]

Read More

महाविद्यालयीन जीवनात आत्मशोध घेण्याची संधी-गायिका आरती अंकलीकर-टिकेकर

पुणे- मी कोण आहे? मला काय आवडते? मला काय व्हायचे आहे? ते करण्या योग्य टॅलेंट माझ्यात आहे का? हा आत्मशोध घेण्याची संधी महाविद्यालयीन जीवनात मिळत असते. विविध स्पर्धांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनी ती शोधली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले. डीईएसच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘हेरिटेज कलेक्टिव्ह विभागा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या […]

Read More

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे–युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि‍ विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा […]

Read More

आमदार बंब, शिक्षक आणि ग्रामीण शिक्षणाचे प्रश्न

डोनेशन ची दुकाने चालवणाऱ्या शिक्षणसम्राटावर कोणी बोलत नाही, लाखभर पगार घेणाऱ्या प्राध्यापक व महाविद्यालयावर कोणी बोलत नाही, कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि शाळांवर कोणी बोलत नाही.माझ्यासकट मीडिया आणि सर्वजण सरकारी शाळा व दवाखान्यावर बोलत राहतात.यात समाज हक्काची भावना आणि खेड्यापाड्यात सर्वदूर त्या असल्याने व डोळ्यासमोर असल्याने त्याविषयी सरपंच ते आमदार सगळे बोलत राहतात. आमदार प्रशांत बंब यांच्या […]

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयू व एमएसईडीसीएल यांच्यात सामंजस्य करार

पुणे-  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत ऊर्जा क्षेत्राशी संबंधीत विविध उद्योग आणि शैक्षणिक क्रियाकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर डब्ल्यूपीयूच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर व गणेशखिंड नागरी परिमंडळ येथेली महावितरणाचे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप यांनी स्वाक्षरी केल्या. या […]

Read More

शिवाजी विद्यापीठ पेपर फुटी प्रकरण : अभाविपचे लोटांगण घालत आंदोलन

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा या मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक प्रकारचा विरोध, मागण्या यातून मार्ग काढत शेवटी बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्याची पद्धती विद्यापीठाने अवलंबली. परंतु मागील अनेक दिवसांपासून वारंवार पेपर फुटी सारख्या घटना घडत आहे. यासंदर्भात आज अभावीप कोल्हापूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोटांगण घेत आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे […]

Read More