चाकणच्या जिल्हा परिषद शाळा नंबर 2 चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

चाकण – चाकण येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये दहा विद्यार्थिनी गुणवत्ताधारक ठरलेल्या आहेत. विद्यार्थिनीं, ईश्वरी थोरात ही २८४ गुण मिळवून शहरी राज्य गुणवत्ता यादीत ५वी व जिल्हा गुणवत्ता यादीत ३री आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम आणि पालकांच्या उपस्थितीत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनींचा […]

Read More

मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही – सुप्रिया सुळे

पुणे–कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील […]

Read More

सक्सेस स्टोरींचा विचार करून राज्य सरकारने शाळांबाबत निर्णय घ्यावा – सुप्रिया सुळे

पुणे–राज्यात अनेक ठिकाणी कोविड काळातही शाळा सुरू होत्या. त्या कशा सुरू होत्या? त्यासाठी काय खबरदारी घेण्यात आली? या सक्सेस स्टोरींचा राज्य सरकारने विचार करावा आणि शाळांबाबत निर्णय घेतला पाहिजे, असं मत व्यक्त करतानाच या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे […]

Read More

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन

पुणे–शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील […]

Read More

एमपीएससीच्या विद्यार्थ्याची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या

पुणे–पुण्यात स्पर्धा परीक्षेचा (एमपीएसी) अभ्यास करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. अमर रामचंद्र मोहिते (33, रा. नवी पेठ, विठ्ठल मंदिराच्या मागे. मुळ गाव – तासगाव, सांगली) याने आत्महत्या केली आहे.  अमर यांचे भाऊ दत्तात्रय रामचंद्र मोहिते हे पिंपरी-चिंचवड […]

Read More

पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड

पुणे–पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तर मुळशीचे सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या नावाची घोषणा अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यातल्या चर्चेनंतर करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 21 जागांपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला तर काँग्रेस आणि […]

Read More