अखेर अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला…..

पुणे- पुण्यातील बालेवाडी येथून भरदिवसा दुचाकीवरून अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला आहे. चिमुरड्याला अपहरणकर्ताच सोडून पसार झाला आहे. त्यानंतर तो सापडला आहे. स्वर्णव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात (दि. ११ जानेवारी) स्वर्णवचे अपहरण […]

Read More

ग्राहक आयोगाचा टाटा टेलि सर्विसेसला दणका : दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

पुणे—‘डू नॉट डिस्टर्ब’ सुरू असताना आणि वारंवार तक्रार करूनही सातत्याने नको असलेले फोन येऊन ग्राहकाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीपोटी दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने टाटा टेलि सर्विसेस लिमिटेडला दिले आहेत. आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितीजा कुलकर्णी आणि संगीता यादव देशमुख यांनी हा निकाल दिला.अॅड. सिद्धार्थशंकर अमर शर्मा […]

Read More

शरद पवारांची अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे- आज (सोमवारी) पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाची पाहणी केली. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेच्या कामाची माहिती घेतली. कामाच्या पुढचा टप्प्याबाबतचीही माहिती घेतली. फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत त्यांनी मेट्रोने प्रवासही केला. पुणे मेट्रोचे काम सध्या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये […]

Read More

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन

पुणे–शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील […]

Read More

एमपीएससीच्या विद्यार्थ्याची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या

पुणे–पुण्यात स्पर्धा परीक्षेचा (एमपीएसी) अभ्यास करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. अमर रामचंद्र मोहिते (33, रा. नवी पेठ, विठ्ठल मंदिराच्या मागे. मुळ गाव – तासगाव, सांगली) याने आत्महत्या केली आहे.  अमर यांचे भाऊ दत्तात्रय रामचंद्र मोहिते हे पिंपरी-चिंचवड […]

Read More

‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे यांच्या गाडीला अपघात

पुणे –कारवरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकल्याने अभिनेते हेमंत बिर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. यामध्ये बिर्जे यांच्यासह त्यांची पत्नी अमना हेमंत बिर्जे आणि कन्या रेश्मा तारिक अली खान यांना दुखापत झाली आहे. तिघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हेमंत बिर्जे यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईत वास्तव्यास असलेले सिनेअभिनेता […]

Read More