पुणे(प्रतिनिधी)-वारजे भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharadchandra Pawar Party) माजी नगरसेवक आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार (MLA) भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्या विरोधात दोनदा विधानसभा लढलेले सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून रविवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Union Minister Murlidhar Mohol) आणि आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सचिन दोडके (Sachin Dodke) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केल्यास भविष्यात भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्या राजकीय करिअरला सुरुंग लागणार असल्याचे मानले जात आहे?
पुण्यातील राजकारणामध्ये सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. वारजे भागात (Warje) दोडकेंच्या भाजप प्रवेशाचे बॅनर्स झळकले असून, त्यावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे सचिन दोडके लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात (Political Circles) सुरू झाली आहे.
सचिन दोडके (Sachin Dodke) यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar) दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. मात्र, दोडकेंच्या संभाव्य पक्षप्रवेशावरून पुणे भाजपामध्ये (Pune BJP) अंतर्गत कलह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सचिन दोडकेंच्या प्रवेशावरून मोठा वाद झाल्याचे सूत्रांकडून समजते. ही महत्त्वाची बैठक खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, ज्यात जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि भाजपचे सर्व नेते उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत उपस्थित असलेले विद्यमान आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांनी सचिन दोडकेंच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला. त्यांनी ‘सचिन दोडकेंचा प्रवेश नको,’ अशी भूमिका घेतली. तापकीर यांनी विरोध करताना एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. मोदींना (Modi) आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) शिव्या देणाऱ्या नेत्याला पक्षामध्ये का घ्यायचे? अशा शब्दांत त्यांनी या प्रवेशाला विरोध दर्शवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर भाजपने अनेक पक्षप्रवेश घ्यायला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने दोडकेंचा प्रवेश होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेनंतर भाजपमध्ये दोन गट पडलेले स्पष्टपणे दिसत आहेत. एक गट सचिन दोडकेंना (Sachin Dodke) विरोध करणारा आहे, तर दुसरा गट त्यांना पक्षात घेण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे हा प्रवेश येत्या काळात नेमका होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
















