ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन :विज्ञान प्रसाराचा ध्रुवतारा निखळला


पुणे(प्रतिनिधी)-सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. डॉ. जयंत नारळीकर हे ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ मांडणारे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. ब्रह्मांडाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे ते एक तज्ञ व्यक्तिमत्व होते.

डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील प्राध्यापक विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणित विषयाचे विभाग प्रमुख होते. त्यांच्या आई मुंबई विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवीधर होत्या, त्यांना साहित्याची ओढ होती आणि त्या अत्यंत सुसंस्कृत व सुशिक्षित महिला होत्या. जयंत नारळीकर यांना शाळेत असल्यापासूनच गणित विषयात विशेष आवड होती. त्यांना वाचनाचाही छंद होता.

अधिक वाचा  नालेसफाईत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करा: मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला सक्त निर्देश

त्यांनी १९५९ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून गणित आणि खगोलीय पदार्थ विज्ञान हे विशेष विषय घेऊन बीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी स्तरावर मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला आणि दोन वर्षांत एमएससी पदवी मिळवली. केंब्रिज विद्यापीठातील जगप्रसिद्ध प्राध्यापक फ्रेडरिक हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. प्राध्यापक हॉईल यांनी त्यांना मनःपूर्वक स्वीकारले. नारळीकर १९५७ ते १९६२ पर्यंत केंब्रिज येथे राहिले. वयाच्या बाविसाव्या वर्षी ते रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सदस्य झाले. किंग्स कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणूनही त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे, त्यांचे वडीलही या संस्थेचे सदस्य होते. १९६६ साली त्यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे यांच्यासोबत झाला.

डॉ. नारळीकरांनी आपल्या संशोधन कार्यात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या पीएचडी प्रबंधात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आकर्षक आकाशस्थ वस्तू आणि सृष्टीची निर्मिती यांचा समावेश होता. या लोकप्रिय सिद्धांतांसंबंधी त्यांनी अतिशय वेगळे विचार आणि दृष्टिकोन मांडले. त्यांच्या सिद्धांतानुसार, विश्वाचा विस्तार होत नाही, तर ते स्थिर आहे असे त्यांनी वर्णन केले. या सिद्धांताने विषयावर नवा प्रकाश टाकला. फ्रेड हॉईल यांच्यासोबत त्यांनी गुरुत्वाकर्षण-सदृश्य सिद्धांत सादर केला, जो प्रसिद्ध आहे. नारळीकर आणि हॉईल यांनी विश्वोत्पत्तिशास्त्रास (Cosmology) महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कामात स्थिर स्थिती सिद्धांत, गुरुत्वाकर्षण सिद्धांत, विद्युत गती इत्यादींचा समावेश आहे. १९८८ मध्ये अमेरिकेच्या एका शहरात खगोलशास्त्रासंबंधी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भाग घेतला होता.

अधिक वाचा  24 तास उलटूनही पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरूच : अलका चौकात पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची तर टिळक रस्त्यावर ठिय्या आंदोलन

विज्ञान हा विषय जनसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि तो लोकप्रिय व्हावा यासाठी, तसेच विज्ञान विषयाच्या प्रसारासाठी डॉ. नारळीकर यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी इत्यादी भाषांमध्ये अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी विज्ञानाचा प्रसार लोकांपर्यंत केला. अनेक नियतकालिके, दैनिके, मासिकांमधून त्यांनी विज्ञान कथा व विज्ञान विषयक माहितीचे लिखाण केले आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध पुस्तकांमध्ये ‘अभयारण्य’, ‘वामन परत ना आला’, ‘अंतराळ’, ‘भस्मासुर’, ‘व्हायरस’, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’, ‘विज्ञानाची गरूड झेप’, ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’, ‘चार नगरात माझे विश्व’, ‘गणितातील गमती जमती’, ‘युगा युगांची जुगल बंदी’, ‘गणित आणि विज्ञानाची’ यांचा समावेश होतो. ‘चार नगरात माझे विश्व’ आणि ‘पाहिलेले देश भेटलेली माणसे’ ही त्यांची आत्मचरित्रे आहेत.

भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. नारळीकर यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. यामध्ये १९६२ मध्ये ‘स्मिथ पुरस्कार’, १९६४ मध्ये ‘ॲडम्स पुरस्कार’, १९७९ मध्ये ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’, १९९० मध्ये ‘इंदिरा गांधी पुरस्कार’, १९९६ मध्ये ‘कलींग पुरस्कार’, आणि २००१ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’चा समावेश आहे. कलींग पुरस्कार हे यामधील काही प्रमुख पुरस्कार आहेत. त्याचप्रमाणे, त्यांना १९६५ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २००४ मध्ये ‘पद्मविभूषण’ हे पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे. १० जानेवारी १९८९ रोजी राष्ट्रीय विज्ञान अकादमीने त्यांना १९८८ सालचा ‘वेणू बापू स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

अधिक वाचा  माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे पुण्यात निधन

डॉ. नारळीकरांनी पुण्यातील ‘आयुका’ (IUCAA – Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या विज्ञान संस्थेचा पाया घातला. या संस्थेच्या माध्यमातून आजही देशातील भावी संशोधक आणि शास्त्रज्ञांची जडणघडण होत आहे. त्यांचे लेखन कार्य शेवटपर्यंत सुरू होते.

त्यांनी खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील संशोधनासोबतच विज्ञान प्रसाराच्या कार्यातही मोठे योगदान दिले. ते खऱ्या अर्थाने भारतीय विज्ञानाचे एक प्रेरणास्रोत होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love