भारत-पाकिस्तान संघर्षावर युद्धविराम : अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता प्रस्थापित

भारत-पाकिस्तान संघर्षावर युद्धविराम
भारत-पाकिस्तान संघर्षावर युद्धविराम

नवी दिल्ली / इस्लामाबाद: गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या शस्त्रसंधीची माहिती दिली, त्यानंतर भारत सरकारनेही अधिकृतपणे याबाबत घोषणा केली.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू होईल. दोन्ही देशांतील लष्करी अधिकारी या निर्णयावर सहमत झाले असून, युद्धविरामाचा निर्णय लागू करण्यात आले आहे. , पाकिस्तानकडून फोन आल्यानंतरच भारताने अधिकृतपणे युद्धविरामाची घोषणा केली आहे, ज्यामुळे दोन देशांमधील तणावाला शेवटी शांतता मिळाली आहे.

अधिक वाचा  कुंभमेळ्याचे भवितव्यही कोरोना लसीवरच अवलंबून;तरच होणार भव्य-दिव्य सोहळा

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सीमा रेषेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर, 7 मे रोजी भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून एअर स्ट्राईक केला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये गोळीबार आणि हवाई हल्ल्यांचा सत्र सुरू झालं होतं.

पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन करून या संघर्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रसंधीच्या निर्णयाची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू होईल, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.

विक्रम मिस्री म्हणाले, “दोन्ही बाजूंना सर्वप्रकारचा गोळीबार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सामंजस्य कराराची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, आणि 12 मे रोजी दोन्ही लष्करी महासंचालक पुन्हा एकदा चर्चा करतील.”

अधिक वाचा  आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे ग्राहकांकडून शुद्ध शाकाहारी बेकरी प्रॉडक्ट्सला मोठी मागणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर ही माहिती शेअर करत दोन्ही देशांच्या सामंजस्याची प्रशंसा केली. “अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या सामंजस्यासाठी आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन!” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love