#तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल आज रात्री राज्य शासनाला सादर केला जाणार; त्यानंतर मंगेशकर रुग्णालयावर कारवाई

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल आज रात्री राज्य शासनाला सादर केला जाणार
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल आज रात्री राज्य शासनाला सादर केला जाणार

पुणे: तनिषा भिसे मृत्यूप्रकरणात आतापर्यंत राज्य आरोग्य विभाग, पुणे धर्मादाय आयुक्त आणि पुणे महापालिकेच्या माता-मृत्यू विभागाचे आहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले आहेत. या सर्व आहवालात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबद्दल आणि डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, दिनानाथ रुग्णालय स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, आता ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल आजच उशिरा राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. या चौथ्या अहवालानंतर दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात दिले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे जिल्ह्यात १५ ते १७ एप्रिल दरम्यान महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील विविध विभागांर्तगत महिला संदर्भात होणाºया अत्याचार, अडचणी, समस्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा देखील आढावा घेतला. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुणे शहर गुन्हे विभागाचे उपायुक्त निखील पिंगळे तसेच भरोसा सेलचे सदस्य उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या की, दिनानाथ रुग्णालयाची घटना घडल्या नंतर ससून रुग्णालयाला समिती गठीत करायला सांगितले होते. या समितीची आढावा बैठक आज पार पडली. भिसे मृत्यूप्रकरणात ससून रुग्णालयाची समिती चौथ्या आहवाल आज रात्री उशिरापर्यंत सादर करणार आहे. राज्यात यापुढे तनिषा भिसेंसारखे कोणतेही प्रकरण पुन्हा घडू नये म्हणून आपण काळजी घेत आहोत. तसेच संबंधितांना चांगली जरब बसावी म्हणून कठोर कारवाई करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्याला तात्पुरती मलमपट्टी करायची नाही. तर दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल करत ठोस कारवाई करायची आहे. जेणेकरुन कोणतेही शासकीय रुग्णालय असो की खासगी रुग्णालयांना चांगली जरब बसली पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे.
———————
तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर आपण समिती स्थापन केली आहे. या समितीचे चामकाज अंतिम टप्प्यात असून आजच रात्री उशिर राज्य शासनाल आहवाल सादर करण्यात येणार आहे. ससूनची समिती उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला आहे की नाही हे पाहते. त्यासाठी सर्व कागदपत्रे आम्ही तपासून पाहत आहोत.
– डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  10 डिसेंबरला शिर्डीत जाणारच: तृप्ती देसाईंचा इशारा