एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ ध्रुव ग्लोबलला कांस्यपदक

एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ ध्रुव ग्लोबलला कांस्यपदक
एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ ध्रुव ग्लोबलला कांस्यपदक

पुणे : एसएफए यांच्या कडून आयोजित शालेय स्तरावरील ‘एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंडर ११ टीम ने आपल्या पूलमधील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.आणि  एकतर्फी पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. संघाने कांस्यपदकाच्या लढतीत यजमान (४)आणि (१४)असा पराभव करून पदक जिंकले. खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्राचार्या संगीता राऊतजी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे कडून सायली जैन, अन्वी बंग, अद्विता मुसळे, कियारा शाह, अनुष्का देव,  शनाया पडळकर आणि प्रिशा काळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

यशवर्धन मालपाणी म्हणाले की, ध्रुव ग्लोबल स्कूल प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. भविष्यातही ही शाळेतील क्रीडा विभाग नवनवीन उंची गाठत राहील. या यशाबद्दल त्यांनी समर्पित प्रशिक्षक पूनम बुटी आणि संकेत कुंभार यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.

अधिक वाचा  भुजबळ साहेबांसारखा नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

प्राचार्या संगीता राऊतजी म्हणाल्या,  ही स्पर्धा जिंकून संघाने उत्कृष्ट कामगिरी व खिलाडूवृत्ती दाखवली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love