वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर दोन कोटीची प्रॉपर्टी

वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर दोन कोटीची प्रॉपर्टी
वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर दोन कोटीची प्रॉपर्टी

पुणे(प्रतिनिधि)–बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर दोन कोटी रुपयांची ॲाफिसची जागा विकत घेतल्याचं समोर आलं आहे.

बीड सरपंच हत्या प्रकणाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोर्चा निघत आहे. असाच एक मोर्चा पुण्यातही निघाला होता. यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांचे दुसरे पत्नी असल्याचा दावा केलेल्या ज्योती जाधव यांच्या दोन बेनामी प्रॉपर्टी पुण्यातल्या प्रसिद्ध फर्ग्युसन रोडवर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवरती त्यासंबंधीतले कागदपत्र आता समोर आले आहेत. या कागदपत्रांमध्ये कुशल ऑल स्टेट या बिल्डिंगमधले दोन गाळे हे ज्योती जाधव यांच्या नावावर असल्याची कागदपत्र पुढे आली आहेत.

अधिक वाचा  भाजपच्या चार महिला आमदारांना अज्ञात भामट्याने घातला ऑनलाईन गंडा

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या  इमारतीत वाल्मिक कराड, ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिसल स्पेसेस बुक करण्यात आल्याची माहिती आहे. ही इमारत पूर्ण बनून तयार झाल्यानंतर त्यांच्यातील खरेदी विक्रिचा व्यवहार पूर्ण होणार होता. मात्र, त्यापूर्वीच हे प्रकरण समोर आलं. वाल्मिक कराडने मुंबई-पुण्यासह इतरही शहरांमधी उद्योग-व्यवसायांमध्ये कोट्यवधी पैसे गुतवल्याचाही आरोप आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love