धंगेकरांना आणखी एक धक्का : नाराज आबा बागुलांनी घेतली फडणवीस आणि बावनकुळेंची भेट

Aba Bagul visited Fadnavis and Bawankule
Aba Bagul visited Fadnavis and Bawankule

पुणे(प्रतिनिधी)-पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धगेकर यांना एका मागून एक,धक्के बसत आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी  थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची थेट नागपूर गाठून भेट घेतली. त्यामुळे महविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. बागुलांच्या या पावित्र्याचे, आम्ही सर्व मिळून रवींद्र धंगेकरांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणू अशा  वल्गना करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजूनही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. 

रवींद्र धंगेकर  हे कसब्याचे आमदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विजयी झाले आणि आमदार झाले. त्यानंतर त्यांना पुणे लोकसभेचीही उमेदवारी देण्यात आली मात्र, याला काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून कोणी उघड तर कोणी छुपेपणाने विरोध पहिल्यापासून दर्शवला आहे.  त्याची तीव्रता  दिवसेंदिवस वाढतच असून  धंगेगेकरांच्या समोर यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

अधिक वाचा  'कौन बनेगा करोडपती'च्या हॉटसीटवर विराजमान झालेल्या श्रीदेवची प्रेरणादायक कहाणी

सुरुवातीपासून नाराज असलेले आबा बागुल यांनी आपली नाराजी काँग्रेस भवन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मुख्य निदर्शने करून दर्शवली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षांतर्गत बैठकांना आबा बागुल यांनी दांडी मारली होती. आता आबा बागुल यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतल्याने पुणे शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आबा बागुल हे काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्यांचे पर्वती मतदारसंघात चांगले काम आहे.त्यांना मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे. आबा बागुलांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठांना काशी यात्रा आणि नवरात्र महोत्सव यामुळे त्यांचा नावलौकिक पर्वती विधानसभा मतदारसंघात मोठा आहे.

पर्वती मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तसेच भाजपचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे लोकसभा निवडणूक समन्वयक श्रीनाथ भीमाले यांचीही ताकद मोठी आहे. आता त्याला जोड आबा बागुलांची मिळाली तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर यांची ताकद पर्वती मतदार संघात वाढून मोहोळ यांच्या मताधिक्क्यात आणखी वाढ आहे होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love