पुण्यात आता पाच दिवस ‘अनलॉक’ आणि दोन दिवस ‘लॉकडाऊन’?


जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेत

पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या १३ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या लॉकऊनची मुदत आज मध्यरात्री संपत आहे. १० दिवसांच्या लॉकडाऊननंतर आता पुन्हा काही पहिल्यासारखे सुरु होईल असे जर आपल्याला वाटत असेल तर जरा थांबा.. कारण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाच दिवस ‘अनलॉक’ आणि दोन दिवस ‘लॉकडाऊन’ होण्याची शक्यता आहे. याबाबत येत्या एक–दोन दिवसात प्रशासकीय स्तरावर विचार विनिमय होऊन लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होऊन कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी एक ‘नाविन्यपूर्ण धोरण’ अमलात आणण्यात येणार असल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून १३ जुलै ते २३ जुलै असा १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्याची मुदत आज संपत आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अशा प्रकारचा लॉकडाऊन पुन्हा होणार नाही असेही याअगोदर स्पष्ट केले होते. मात्र, पाच दिवस ‘अनलॉक’ आणि दोन दिवस पूर्ण ‘लॉकडाऊन’ करण्याबाबत विचार सुरु असल्याचे ‘एबीपी माझा’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हे दोन दिवस शनिवार आणि रविवार असतील असेही ते म्हणाले. शनिवार-रविवार लॉक उगाचच बाहेर पडतात आणि त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका असतो त्यामुळे काही निर्बंध आणणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

अधिक वाचा  खासगी पॅथॅलॉजी लॅब मनपाच्या रडारवर: कोरोना चाचण्यांचे पॉझीटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण जास्त

लग्नाच्या संदर्भातील नियमांमध्ये दिलेली शिथिलताही कमी करणार

लग्नासाठी ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र, बऱ्याच वेळेस १०० लोकही उपस्थित राहतात त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा संक्रमन होण्याचा धोका वाढतो. आम्ही अशा लोकांवर गुन्हेही दाखल केले आहेत. मात्र, प्रत्येकवेळी गुन्हे दाखल करणे शक्य नसते त्यामुळे आता लग्नाला उपस्थितीच्या नियमांमध्ये दिलेली शिथिलताही कमी करावी लागेल आणि ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीचा  नवीन नियम आणावा लागेल, असे राम यांनी स्पष्ट केले.   

पुण्यात बेड्स अथवा व्हेंटीलेटर कमी नाहीत

कोरोना रुग्णांचे दो-तीन प्रकार आहेत. बऱ्याच वेळा एका भागातील रुग्ण असेल तर तो आपल्या जवळच्या रुगणालयात जातो. तिथे बेड नसेल तर बेड शिल्लक नाही असे म्हटले जाते. परंतु इतर भागातील रुग्णालयात बेड उपलब्ध असतात. बारकाईने माहिती घेतली तर आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. काही रुग्णांची टेस्ट झालेली नसते आणि ते अगदी ऐनवेळी रुग्णालयात दाखल होण्यासाठी येतात त्यावेळी प्रश्न निर्माण होतो असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  #Murlidhar Mohol : मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते :पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर केले हे वक्तव्य

या महिन्यात ७००-८०० नवीन आयसीयू बेड उपलब्ध होणार असून पुन्हा अशा प्रकारची ओरड ऐकायला मिळणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

लॉकडाऊनचा अप्रत्यक्ष परिणाम पुढे दिसून येईल

दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण दररोज १२ ते १३,५०० चाचण्या म्हणजे सरासरी १० हजारांपेक्षा जास्त चाचण्या याकाळात घेतल्या गेल्या. त्यामुळे याकाळात कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तुटण्यासाठी याचा नक्कीच फायदा झाला आहे. त्याचे अप्रत्यक्ष परिणाम आज नाही पण पुढे आपल्याला दिसतील असे सांगत राम यांनी लॉकडाऊनचे समर्थन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love