वुहान प्रयोगशाळेत चुकीचे प्रयोग सुरु असल्याचे दोन वर्षांपूर्वीच अमेरिकेला माहिती होते?

आंतरराष्ट्रीय
Spread the love

वॉशिंग्टन(ऑनलाईनटीम)— दोन वर्षापूर्वीच अमेरिकेतील काही राजकीय नेत्यांनी चीनच्या वुहान लॅबमध्ये चुकीचे प्रयोग चालू असल्याचे आणि ज्यामुळे सार्ससारख्या धोकादायक साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो असल्याचे सांगितले होते, असे अमेरिकेने २०१८ मध्ये देशांतर्गत लिहिलेल्या एका पत्राचा हवाला देत म्हटले आहे. या पत्राच्या माध्यमातून अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा कोरोनाच्या मुद्यावरून लक्ष्य केले आहे.

या पत्रात काही राजकीय नेत्यांनी वुहानच्या प्रयोगशाळेतील सुरक्षा मानकांबाबत अनेक आक्षेप नोंदवले होते. पत्रात असे म्हटले आहे की प्रयोगशाळेत वटवाघळांवर प्रयोग सुरू आहेत आणि जर सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत तर प्रयोगशाळेमुळे सार्स सारख्या साथीचा आजार निर्माण होईल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत बोलतानाम्हणाले,  की मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे की हे चीनचे कारस्थान आहे आणि आता या पत्राने हे सिद्ध केले आहे की यामध्ये 100% चीनचा हात  आहे. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो म्हणाले की, मी पुराव्यासह सांगू शकतो की हा करोना हा साथीचा रोग चीनच्या प्रयोगशाळेतूनच पसरला आहे.   

त्याच वेळी मे महिन्यात अमेरिकन गुप्तचर समुदायाने म्हटले होते की हा साथीचा रोग प्राण्यांच्या संपर्कातून झाला की वुहान लॅबमध्ये झालेल्या अपघाताचा परिणाम होता, हे आम्ही अद्याप जाणून घेत आहोत.

दरम्यान,  कोलंबिया विश्वविद्यालयाचे सेंटर फॉर इंफेक्शन एंड इम्यूनिटी सेंटरचे संचालक इयान लिपकिन यांनी हा दावा फेटाळून लावत असे म्हटले आहे की या पत्रातून चीनने हे हेतूपूर्वक केले किंवा नकळत केले हे सिद्ध होत नाही. त्यासाठी तुम्हाला पुरावे द्यावे लागतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *