जिल्हास्तरीय वैचारिक निबंध स्पर्धेत विलास पंढरी व अजित जाधव प्रथम

क्रीडा
Spread the love

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे जिल्ह्याच्या वतीने ‘जिल्हास्तरीय वैचारिक निबंध स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे जिल्हास्तरावर हवेली तालुक्यातील विलास पंढरी व पुरंदर तालुक्यातील अजित जाधव यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मुळशी तालुक्यातील करण सारडा हे तृतीय क्रमांकाने विजयी झाले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

सध्याच्या परिस्थितीला अनुसरून ‘कोरोना नंतरचे होणारे संभाव्य बदल’ या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्व सुज्ञ आणि अभ्यासू नागरिकासांठी खुली होती. या स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. तालुका स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, १० हजार तसेच पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे तसेच जिल्हास्तरीय प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार, ११ हजार तसेच पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. तर ही स्पर्धा ऑनलाईन असल्याने सहभागी सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्या-त्या तालुक्यांमध्ये लॉकडाऊन संपल्यावर करण्यात येईल, असेही गारटकर यांनी सांगितले.

स्पर्धेचा निकाल –  
आंबेगाव तालुक्यातून दिव्या चिखले (प्रथम), आकाश कुंजीर (द्वितीय) तर बारामती तालुक्यातून निखील थोरवे (प्रथम), प्रथमेश तावरे (द्वितीय), सई घुले (तृतीय) विजयी ठरले आहेत. इंदापूर तालुक्यातून शैलेश गलांडे (प्रथम), सुमित जगताप (द्वितीय), संजय धुमाळ (तृतीय) हे विजेते असून भोर तालुक्यातून ज्योती दीक्षित, अंकिता शेटे, दिपाली शेडगे हे अनुक्रमे प्रथम तीन विजेते आहेत. तसेच दौंड तालुक्यातून प्रियांका तेली, ज्ञानेश्वर भोगवडे, समीक्षा गायकवाड तर हवेली तालुक्यातून विलास पंढरी, विवेक चित्ते, योगिता बालाक्षे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले आहेत. त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातून उज्ज्वला गायकवाड प्रथम विजेत्या असून वेल्हे तालुक्यात सुरेश कोळी, उज्ज्वला देवगिरीकर व श्रद्धा राजीवडे हे अनुक्रमे प्रथम तीन विजेते ठरले आहेत.

याबरोबरच जुन्नर तालुक्यातून आकांक्षा घोगरे (प्रथम), सौरभ शिंदे (द्वितीय), खेड तालुक्यातून डॉ. श्रुती गुजराथी (प्रथम), मावळ तालुक्यातून अमीन खान (प्रथम), शबनम खान (द्वितीय), महेश भागीवंत (तृतीय) हे विजेते आहेत. तसेच मुळशी तालुक्यातून करण सारडा प्रथम, अक्षय येलांजे द्वितीय क्रमांकाने विजयी ठरले आहेत. तर पुरंदर तालुक्यातून अजित जाधव (प्रथम), कौस्तुभ रासकर (द्वितीय) व प्रमोद धायगुडे (तृतीय) क्रमांकाने विजयी ठरले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *