आयपीएल 2020 मध्येही होणार ‘व्हर्च्युअल कॉमेंट्री’चा प्रयोग?


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–कोरोनाच्या संकटामुळे जगामध्ये अनेक बदल घडत आहेत. कोरोनामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रावरही फार मोठा परिणाम झाला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाचा स्वीकार करत या क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत.  स्टार स्पोर्ट्सने सेंच्युरियन पार्क येथे भरवलेल्या तीन संघांमधील 36  षटकांच्या सामन्यात ‘व्हर्च्युअल कॉमेंट्री’चा प्रयोग केला होता. आयपीएल 2020 युएईमध्ये होणार आहे, तेव्हाही असे नवीन प्रयोग पाहायला मिळू शकतात.

खरं तर, दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन पार्क येथे  खेळल्या गेलेल्या मॅचची कॉमेंट्री इरफान पठाणने बडोद्यातील त्याच्या घरातून, दीप दासगुप्ता यांनी कोलकात्यातून आणि संजय मांजरेकर यांनी त्यांच्या मुंबईतील घरातून आपल्या आवाजांमध्ये केली होती. आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूरवर होत असलेल्या सामन्याची आपल्या घरातून कॉमेंट्री करण्याच्या अनुभवाचे अष्टपैलू इरफान पठाणने ‘जादुई’ असे वर्णन केले.  

अधिक वाचा  गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बाहेर

केवळ समालोचकच नाही तर संबंधित कर्मचारी सुद्धा देशातील विविध भागातून ‘लॉग इन’ होते आणि त्याचवेळी या सामन्याचे निरीक्षक म्हैसूरमध्ये बसून सर्वांवर नजर ठेवून होते. जर सुरुवातीच्या काही बाबी सोडल्या गेल्या तर हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आणि आगामी आयपीएलमध्येही हा प्रयोग होऊ शकतो. जरी हिंदी आणि इंग्रजी समालोचनामध्ये ही गोष्ट होऊ शकली नाही तरी  तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा प्रादेशिक भाषांमध्ये याची सुरुवात होऊ शकते.

इरफानने  पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘हा एक विलक्षण अनुभव होता परंतु आम्हाला संपूर्ण वेळ भीती वाटत होती कारण इंटरनेटची गती कमी-जास्त होऊ शकत होती आणि त्याचा परिणाम आवाजावर    झाला असता. जेव्हा सामन्याचे थेट प्रसारण होत असते तेव्हा काहीही घडू शकते कारण तंत्रज्ञान आपल्या नियंत्रणात नाही.    

अधिक वाचा  पुण्यातील पवन सिंह यांची ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेसाठी सलग दुसऱ्यांदा ज्युरी म्हणून निवड

तो म्हणाला, ‘हा जरी हा एक प्रदर्शनी सामना होता तरी, प्रत्येकजण त्यास गांभीर्याने घेत होता. स्टार आपली योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवतो, परंतु घरातून समालोचन करणे हे आयपीएलमध्ये मोठे आव्हान असेल.’

या माजी अष्टपैलूने सांगितले की, लक्ष विचलित होऊ नये म्हणून तो एका खोलीत एकटाच बसला होता.     परंतु त्याचा मुलगा अधून-मधून दरवाजा ठोठावत होता. आयपीएल दरम्यान मुंबईत पॅनेल चर्चा सुरू असते, त्यात देखील इरफान सहभागी असतो. प्रक्षेपण क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांचे मत आहे की भविष्यात जगातील कोणत्याही ठिकाणाहून समालोचन करणे ही सामान्य गोष्ट होऊ शकते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love