अबब! दिवसभरात कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू


 पुणे- पुन्हा एकदा रविवार कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी घातक दिवस ठरला आहे. रविवारी दिवसभरात तब्बल २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने पुण्याची चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६२१ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ४८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

लॉकडाऊन उठवल्यानंतर पुण्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला अटकाव करणे अशक्य झाले आहे.

आत्तापर्यंत पुण्यामध्ये बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या १७४८२ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यू ८४० झाले आहेत. सध्या  शहारतील एकूण गंभीर रुग्णांची संख्या ४८७ असून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण १७२ इतके आहेत.

अधिक वाचा  मास्क न वापरल्यास एक हजाराचा दंड -अजित पवार

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २७५२५ इतकी झाली असून पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ९२०३ इतकी आहे. आज एकूण ५५२ स्वॅब चाचण्या घेण्यात आल्या तर ९६२  रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. आज पर्यंत एकूण १६०८५५ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love