पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक बंद

पुणे–मागील आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. विसर्ग करण्यात आलेले पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रवाहात वाहत आहे त्यामुळे डेक्कन नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. […]

Read More