जगाने सोडला निश्वास: चीनचे The Long March 5B रॉकेट कोसळले ‘या’ठिकाणी


बीजिंग : चीनचे The Long March 5B या शक्तीशाली रॉकेटवरचे नियंत्रण सुटल्यानंतर ते कुठे कोसळणार याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, जगाने याबाबत निश्वास सोडला आहे. हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले असल्याचे वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. हिंदी महासागरात कोसळण्याआधी या रॉकेटचा बहुतांश भाग जळून नष्ट झाले होते.

चीनच्या स्टेट मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार, 10 वाजून 24 मिनिटांनी The Long March 5B च्या अवशेषांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता. नंतर या रॉकेटचे अवशेष 72.47 डिग्री पूर्व अशांश आणि 2.65 डिग्री उत्तर रेखांश या ठिकाणी पडले. हे ठिकाण मालदीवच्या पश्चिमेला काही अंतरावर आहे.

अधिक वाचा  काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी-भजनलाल शर्मा

चीनने २९ एप्रिलला तियान स्पेस स्टेशन बनवण्यासाठी सगळ्यात मोठे रॉकेट ५बी अवकाशात सोडले होते. मागील वर्षी चीनमधील अंतरिक्ष केंद्रावरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलं होतं. मात्र अमेरिकन मिलिटरीने चीनचं रॉकेट कधी कोसळणार याबाबतचं भाकीत केलं होतं.  चीनच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं आणि अवकाशात निष्क्रिय झालेलं रॉकेट लाँग मार्च ५ बी हिंदी महासागरात कोसळलं आहे.

जगभरात या रॉकेटचे तुकडे नेमके कुठे आदळणार याची माहिती नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कुठेतरी हे रॉकेट पडेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त समुद्रात हे रॉकेट पडावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता हे रॉकेट हिंदी महासागरात पडल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता मिटली आहे.

अधिक वाचा  भारताची चांद्रयान-३ मोहीम फत्ते : भारत ठरला चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा पहिला देश : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे काय आहे महत्व?

या रॉकेटचा बहुतांशी हिस्सा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना जळून खाक झाल्याची माहिती चीनच्या स्टेट मीडियाने दिली आहे. जवळपास 100 फुट लांब असलेले हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे प्रवास करत होते. चीनने अंतराळात तयार करण्यात येत असलेल्या स्पेस स्टेशनचा पहिला भाग या रॉकेटच्या मदतीने पाठवला होता. तियान्हे नावाचे एक स्पेस स्टेशन चीन अवकाशात उभे करत आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love